राम शिंदेंच्या चौंडी गावात राष्ट्रवादीचा सरपंच (Sarpanch of NCP in Choundi village of Ram Shinde)

जामखेड टाईम्स वृत्तसेवा (सत्तार शेख) तालुक्यातील प्रतिष्ठेची असलेली चोंडी ग्रामपंचायतच्या सरपंचपदी राष्ट्रवादीच्या आशाबाई सुनील उबाळे तर उपसरपंचपदी कल्याण रामभाऊ शिंदे यांची बिनविरोध निवड झाली आहे. थोड्याच वेळात यावर अधिकृत शिक्कामोर्तब होणार आहे.

चौंडी ग्रामपंचायत निवडणुकीत राष्ट्रवादीने मुसंडी मारत भाजपला अर्थात माजी मंत्री राम शिंदे यांच्या गटाला जोरदार धक्का देत ग्रामपंचायतीवर कब्जा मिळवला होता. राम शिंदे यांच्या गटाला अवघ्या दोन जागांवर विजय मिळाला होता. तर राष्ट्रवादीने सात जागा जिंकल्या होता. चौंडीचा निकाल राज्याच्या राजकारणात भलताच चर्चिला गेला होता.