जामखेड टाइम्स वृत्तसेवा : ८ जूलै २०२३ : जामखेड कृषि उत्पन्न बाजार समितीच्या वतीने जामखेड तालुक्यातील जवळा येथे उपबाजार समिती सुरु करावी, अशी मागणी जवळ्याचे सरपंच प्रशांत शिंदे यांनी जामखेड बाजार समितीकडे केली आहे.
जामखेड तालुक्यातील जवळा हे सर्वात मोठे गांव आहे.जवळा ही मोठी व्यापार पेठ आहे. आजु-बाजुच्या परीसरातील शेतक-यांची जवळा येथील बाजारपेठेत नेहमी वर्दळ असते, जवळा परीसरातील सर्व शेतक-यांची जवळा येथे उपबाजार समीती व्हावी अशी खुप जुनी मागणी आहे. जवळा येथे उपबाजार समीती झाल्यास जवळा व परिसरातील गावांमधील शेतक-यांचा वेळ व पैशाची बचत होवु शेतक-यांना त्याचा फायदा होईल. त्यामुळे जवळा येथे उपबाजार सुरु करावा अशी मागणी जवळा ग्रामपंचायतने जामखेड कृषि उत्पन्न बाजार समितीकडे करण्यात आली आहे.
जवळा उपबाजारासाठी आवश्यक असणारी जागा व आवश्यक सर्व कागदपत्रे जवळा ग्रामपंचायतकडून उपलब्ध करून देण्याची तयारी दर्शविण्यात आली आहे. गेल्या अनेक वर्षांपासूनची जवळा उपबाजारची मागणी सरपंच प्रशांत शिंदे यांनी पुन्हा लावून धरली आहे. प्रशांत शिंदे यांनी केलेल्या शेतकरी हिताच्या या मागणीला जामखेड बाजार समिती सकारात्मक प्रतिसाद देणार असल्याचे बोलले जात आहे. यामुळे जवळा व परिसरातील गावांमधील शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.
दरम्यान, जवळा गावचे सरपंच प्रशांत शिंदे, उपसरपंच काकासाहेब वाळुंजकर व ग्रामपंचायत सदस्यांनी बाजार समितीचे सभापती शरद कार्ले व संचालक मंडळाची खर्डा उपबाजार समितीत भेट घेतली. या भेटीत सरपंच प्रशांत शिंदे व त्यांच्या सहकाऱ्यांनी जवळा येथे उपबाजार समिती सुरु करण्यात यावी या मागणीचे निवेदन दिले.
यावेळी सभापती शरद कार्ले, संचालक गौतम उतेकर, संचालक सचिन घुमरे, नंदू गोरे, राहुल बेदमुथा, सुरेश पवार, डॉक्टर ससाणे, विष्णू भोंडवे, डॉ गणेश जगताप, वैजीनाथ पाटील, बबन हुलगुंडे मार्केट कमिटी चे सचिव वाहेद सय्यद व ढगे साहेब जवळा सरपंच प्रशांत भाऊ शिंदे, उपसरपंच काकासाहेब वाळुंजकर, युवा नेते राहुल पाटील, व्यापारी व ग्राम पंचायत सदस्य दया भाऊ कथले, ग्रामपंचायत सदस्य दीपक देवमाने, ग्रामपंचायत सदस्य अनिल हजारे, युवा नेते अमोल हजारे, शिवसेना युवा नेते नितीन कोल्हे सह आदी उपस्थित होते