agricultural commodity market prices | नव्या मुगासह उडदाला उठाव; बाजारभाव तेजीत !
जाणून घ्या 'या' बाजार समितीचे बाजारभाव
जामखेड टाईम्स वृत्तसेवा :agricultural commodity market prices | सध्या बळीराजाची उडीद व मुग काढण्याची लगबग सुरू आहे. उडीद विक्रीसाठी बाजारात समित्यांमध्ये दाखल होऊ लागला आहे. सोलापूर बाजार समितीच्या (market committee) आवारात गतसप्ताहात उडीद, मुगाची (moog) चांगली आवक झाली आहे. त्यांचे दरही वधारलेले राहिल्याचे बाजार समितीच्या सूत्रांकडून सांगण्यात आले आहे.
agricultural commodity market prices | सोलापुर (Solapur) बाजार समितीच्या (market committee) आवारात गतसप्ताहात मुगाची आवक रोज २० ते ४० क्विंटल आणि उडदाची (Urad) ७० ते १०० क्विंटलपर्यंत आवक राहिली. दोन्हींचीही आवक स्थानिक भागातूनच झाली. गेल्या पंधरवड्यापासून नव्या मूगासह उडदाची आवक बाजारात सुरु झाली आहे.
agricultural commodity market prices | सध्या त्यांना मागणीही वाढली आहे. त्यामुळे यंदाच्या हंगामाच्या सुरवातीपासूनच दर बऱ्यापैकी मिळत आहेत. मुगाला प्रतिक्विंटलला किमान ५८०० रुपये, सरासरी ६५०० रुपये आणि सर्वाधिक ७००० रुपये, तर उडदाला किमान ६००० रुपये, सरासरी ६७०० रुपये आणि सर्वाधिक ७२०० रुपये दर मिळत आहे.
agricultural commodity market prices| कांदा (Onion)आणि लसणालाही पुन्हा एकदा चांगला उठाव मिळाला. लसणाची आवक मात्र वाढली. एक-दोन दिवसाआड ५० ते १०० क्विंटलपर्यंत त्याची आवक होती. लसणाला (Garlic) प्रतिक्विंटलला किमान ३००० रुपये, सरासरी ५००० रुपये आणि सर्वाधिक ८००० रुपये, कांद्याला किमान २०० रुपये, सरासरी १००० रुपये आणि सर्वाधिक २३०० रुपये दर राहिला.
गेल्या दोन आठवड्यांपासून भाज्यांच्या आवकेत आणि दरात मोठा चढ-उतार राहिला. पण या सप्ताहात त्यात किंचित सुधारणा झाल्याचे दिसून आले. या सप्ताहात मेथीला (Fenugreek) शंभर पेंढ्यांसाठी ६०० ते ११०० रुपये, शेपूला (Shepu) ३५० ते ५०० रुपये, कोथिंबिरीला (Cilantro) ५०० ते ८०० रुपये असा दर मिळाला. तर पालक (Spinach)आणि चुक्याला प्रत्येकी २०० ते ३५० रुपये असा दर होता. (ॲग्रोवन)