Illegal stone Mines | अवैध्य दगड खाणींवर प्रांताधिकारी अर्चना नष्टे यांच्या पथकाने केली छापेमारी !
जामखेड तालुक्यात अवैध्य दगड खाणी व खडी क्रेशर केंद्रांचा मोठा सुळसुळाट
जामखेड टाईम्स वृत्तसेवा : तालुक्यात अवैध्य दगड खाणी (Illegal stone mines) व खडी क्रेशर केंद्रांचा (stone crusher centers) मोठा सुळसुळाट झाला आहे. खाण माफियांविरोधात (Mining Mafia) कारवाई व्हावी अशी मागणी सातत्याने होत आहे. मात्र याकडे महसूल विभागाचे सोईस्कर दुर्लक्ष ठरलेले आहे. मात्र अचानक शनिवारी महसुल विभागाला जाग आली अन खाण माफियांविरोधात कारवाईचा दंडुका उगारला गेला. (Revenue department takes action Illegal stone Mines against mining mafias)
जामखेड तालुक्यातील गोयकरवाडी (Goykarwadi) हद्दीमध्ये सुरू असलेल्या अवैध्य दगड खाणींवर (Illegal stone mines) प्रांताधिकारी अर्चना नष्टे यांच्या पथकाने छापेमारी केली या कारवाईत महसुल विभागाने एक ब्रेकर मशीन व पोकलेन मशीन जप्त केले आहे. ही कारवाई शनिवारी दुपारी करण्यात आली आहे.
या कारणामुळे महसूलला आली जाग
गोयकरवाडी परिसरात गेल्या अनेक वर्षांपासून अवैध्यरित्या दगड खाणी (Illegal stone mines) सुरू आहेत. मात्र प्रत्येक वेळी जुजबी कारवाई होते. येथील अवैध्य खाणींचा मुद्दा विधानपरिषदेतही गाजला आहे परंतु या खाणी सुरूच आहेत. या खाणी बंद व्हाव्यात यासाठी ऑगस्ट महिन्यात एक उपोषण होणार होते. त्याआधीच महसुल विभागाने गोयकरवाडी परिसरात छापेमारी केली.