government soybean procurement center | जामखेड तालुक्यात शासकीय सोयाबीन खरेदी केंद्र सुरू करण्याच्या मागणीसाठी युवक क्रांती दल आक्रमक

जामखेड टाईम्स वृत्तसेवा : government soybean procurement center | सोयाबीनचे दर पडल्यामुळे राज्यातील शेतकरी हतबल झाला आहे. सोयाबीनची खरेदी सरकारी खरेदी केंद्राद्वारे व्हावी यासाठी युवक क्रांती दल ही सामाजिक संघटना आता आक्रमक झाली आहे. संघटनेने जामखेड तहसिल कार्यालयाला निवेदन देत विविध मागण्या केल्या आहेत.

युवक क्रांती दल संघटनेने हमीभावाने सोयाबीन खरेदी करण्याबरोबरच हमीभावापेक्षा कमी दराने खरेदी करणाऱ्या व्यापाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात यावी तसेच जामखेड तालुक्यात शासकीय सोयाबीन  खरेदी केंद्र सुरू करावे अशी मागणी केली आहे.

government soybean procurement center

युवक क्रांती दलच्या वतीने जामखेड तहसिल कार्यालयात विविध मागण्यांचे निवेदन नायब तहसीलदार मनोज भोसीकर यांना देण्यात आले. यावेळी युक्रांदचे सहकार्यवाह अप्पा अनारसे, अनिल घोगरदरे, विशाल राऊत, अजय नेमाने, तुकाराम घोगरदरे, विशाल रेडे, योगेश लोंढे, ॲड अरुण जाधव, संभाजी ब्रिगेडचे अवधूत पवार हे उपस्थित होते.

सोयाबीनने आणले शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी

दोन आठवड्यांपूर्वी सोयाबीनला साधारणपणे १० हजार प्रती क्विंटल दर होता. आता त्यात मोठी घसरण होवून प्रती क्विंटल ५५०० ते ५७०० दर आहे. म्हणजे तब्बल ४० ते ५० टक्के दर पडले आहेत. केंद्र सरकारने १२ लाख टन सोयापेंड आयात केली आहे. परिणामी सोयाबीनचे दर पडले आहेत. सोयाबीनचे भाव अजून मोठ्या प्रमाणावर पडणार आहेत, असे म्हणून व्यापारी शेतकऱ्यांना घाबरवत आहेत. केंद्र सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे सोयाबीन उत्पादक शेतकरी संकटात सापडला आहे. सोयाबीनचे बाजार कोसळल्यामुळे शेतकऱ्यांच्या डोळ्यात मात्र पाणी आणले आहे.

महागाई वाढली तरी फक्त ७० रुपयांची हमीभाव वाढ

शेतमाल पिकवण्यासाठी लागणाऱ्या खते, बियाणे, औषधं, औजारे, यंत्र, ते यंत्र चालण्यासाठी लागणारे इंधन (डिझेल) यांचे भाव गगनाला भिडले आहेत. मात्र त्याच वेळेस शेतमालाचे भाव मात्र संघटितपणे पाडण्याचं काम केले जात आहे. टोमॅटोचा लाल चिखलं नुकताच सगळ्यांनी पाहिला आहे.२०२०-२१ मध्ये सोयाबीनला ३८८० प्रति क्विंटल भाव होता, तर चालू हंगामात ३९५० रुपये. इतर महागाईच्या तुलनेत हमीभावामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होणं गरजेच होतं. त्यामुळे हमीभावामध्ये वाढ करण्यात यावी. अशी मागणी युवक क्रांती दल (युक्रांद) करत आहे.

 

web title: Yuvak Kranti Dal is aggressive in demanding to start a government soybean procurement center in Jamkhed taluka