सुभाष काळदातेंच्या शक्तिप्रदर्शनाने विरोधकांना भरली धडकी, प्रचाराच्या आधीच विरोधक झाले घायाळ, शेकडो समर्थकांच्या उपस्थितीत काळदाते गटाने दाखल केले उमेदवारी अर्ज
जामखेड टाइम्स वृत्तसेवा । सत्तार शेख । पक्षांतराच्या घटनेमुळे दहा दिवसांपुर्वी राज्याच्या राजकारणात चर्चेत आलेल्या राजुरी गावात ग्रामपंचायत निवडणुकीमुळे राजकीय वातावरण चांगलेच ढवळून निघाले आहे. उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी राजुरीचे जेष्ठ नेते सुभाष (तात्या) काळदाते यांच्या गटाने भव्य दिव्य रॅली काढत जोरदार शक्तिप्रदर्शन केले. काळदाते यांनी केलेले शक्तिप्रदर्शन विरोधकांना धडकी भरवणारे ठरले आहे. यामुळे प्रचाराच्या आधीच विरोधक घायाळ झाले आहेत.
राजुरीचे जेष्ठ नेते सुभाष (तात्या) काळदाते आणि सरपंच पदाच्या उमेदवार वैशाली सुभाष काळदाते यांच्या नेतृत्वाखाली राजुरी ग्रामपंचायत निवडणुकीसाठी सर्व उमेदवारांचे उमेदवारी अर्ज जामखेड तहसिल कार्यालयात आज 2 रोजी दाखल करण्यात आले. यावेळी सुभाष तात्या काळदाते यांनी केलेले जंगी शक्तिप्रदर्शन जामखेडरांचे लक्ष वेधणारे ठरले.
यावेळी सुभाष तात्या काळदाते हे उघड्या जिप्सीमधून तर त्यांचे समर्थक मोटारसायकल आणि मोठ्या गाड्यांमधून रॅलीद्वारे उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी आले होते. यामध्ये महिलांची उपस्थिती मोठ्या संख्येने होती. काळदाते यांच्या रॅलीत शेकडो समर्थक सहभागी होते. रॅलीद्वारे काळदाते यांनी केलेले शक्तिप्रदर्शन विरोधकांची हवा गुल करणारे ठरले आहे, अशी चर्चा तहसील आवारात रंगली होती.
दरम्यान, काळदाते गटाने सकाळी राजुरी गावातील ग्रामदैवत प्रभू श्रीराम मंदिर, रेणूकामाता मंदिर, बौध्द विहार, सदरोद्दीन बाबा यांचे दर्शन घेतले.काळदाते गटाने गावातही जोरदार शक्तिप्रदर्शन केले. रॅलीद्वारे काळदाते गट उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी जामखेडच्या रवाना झाला. या रॅलीत शेेकडो मोटारसायकली आणि मोठ्या गाड्या सहभागी झाल्या होत्या. काळदाते गटाला जनतेचा उत्स्फूर्त असा जंगी प्रतिसाद मिळत असल्याचे आजच्या रॅलीतून अधोरेखित झाले. या रॅलीतून महिला, तरूण, जेष्ठ नागरिक आणि सर्वसामान्य जनता काळदाते यांच्या पाठिशी मोठ्या प्रमाणात एकवटल्याचे दिसले, या रॅली 700 पेक्षा अधिक लोक सहभागी झाले होते.
यंदाच्या राजुरी ग्रामपंचायत निवडणुकीत सुभाष तात्या काळदाते यांच्या गटाच्या सरपंचपदाच्या उमेदवार वैशालीताई सुभाष काळदाते ह्या जनतेच्या आग्रहाखातर यंदाच्या निवडणुकीला सामोरे जात आहे. जनतेच्या वाढत्या पाठिंब्यामुळे काळदाते गटाचे पारडे जड झाले आहे.
वैशाली सुभाष काळदाते, संभाजी शिवदास कोल्हे, वैशाली सुधीर सदाफुले, विशाल अशोक चव्हाण, दैवशाला विशाल चव्हाण, भाऊसाहेब किसन काळदाते, संगीता बाळासाहेब मोरे, विमल विकास सदाफुले,सुरेश आश्रूबा खाडे, भरत दिलीप डोळे, विजूबाई भास्कर घुले, सविता भैरवनाथ डोळे, गौतम आश्राजी फुंदे, ऊर्मिला गौतम फुंदे, सुरज सुनिल गायकवाड, अनिल पांडुरंग गायकवाड, संगीता शिवदास कोल्हे, सागर दत्तात्रय फुंदे, यांच्यासह 700 कार्यकर्त्यांनी जोरदार शक्तिप्रदर्शन केले.