धन्यवाद मोदीजी ! जामखेड तालुक्यातील 200 महिलांनी पाठवले पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र, माजी सभापती आशाताई शिंदे आणि मनिषाताई मोहळकर यांचा पुढाकार !
जामखेड टाइम्स वृत्तसेवा । पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकार गोरगरीब जनतेसाठी राबवत असलेल्या विविध लोक कल्याणकारी योजनांचा मोठा लाभ सामान्यांना मिळत आहे, त्यामुळे माजी सभापती आशाताई राम शिंदे आणि महिला आघाडीच्या तालुकाध्यक्षा मनिषा मोहळकर यांच्या नेतृत्वाखाली जामखेड तालुक्यातील 200 महिलांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानण्यासाठी ‘धन्यवाद मोदीजी’ असा मजकुर लिहलेले पत्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पाठवले.
जामखेड तालुक्यातील चोंडी येथे 2 फेब्रुवारी रोजी महिला बचत गटांचा मेळावा पार पडला. केंद्र सरकारच्या विविध योजनांच्या माध्यमांतून महिला बचत गटांना आर्थिक ताकद दिली जात आहे.केंद्र सरकारकडून मिळत असलेल्या विविध योजनांच्या माध्यमांतून महिला सक्षमीकरणाकडे वेगाने वाटचाल होत आहे. त्यामुळे महिला बचत गटातील 200 महिलांनी माजी सभापती आशाताई राम शिंदे आणि महिला आघाडीच्या तालुकाध्यक्ष मनिषा मोहळकर यांच्या नेतृत्वाखाली देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानणारे पत्र स्व हस्ताक्षरात लिहीत मोदीजींना पाठवले.
यावेळी आमदार राम शिंदे यांच्या मातोश्री भामाबाई शंकर शिंदे, माजी सभापती आशाताई राम शिंदे,भाजपा ओबीसी सेलच्या जिल्हा उपाध्यक्षा मंजुश्रीताई जोकारे, महिला आघाडीच्या तालुकाध्यक्षा मनिषा मोहळकर, चोंडीच्या माजी उपसरपंच वर्षा उबाळे, संकल्प ग्राम संघाच्या अध्यक्षा अनिता मोहोळकर, स्वाती गोरे, मीना उबाळे, भाग्यश्री कोकाटे, नीलम सोनवणे, कोमल कदम, वैशाली शिंदे, विद्या खरात, प्रीती देवकर, पूनम मस्के, मुमताज सय्यद, मंगल रोमाडे, सुमन खरात, विद्या खरात, मीना उबाळे, भाग्यश्री कोकाटे सह आदी महिला बचत गटाच्या सदस्या मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.