कर्जत-जामखेडच्या सिंचन विहिरी खोदाईचा प्रश्न मार्गी (The problem of digging irrigation wells of Karjat-Jamkhed has been solved)

आ. पवारांच्या पाठपुराव्याने कर्जतमधील ६२ तर जामखेडमधील ८७ गावांचा योजनेत सामावेश

जामखेड टाईम्स वृत्तसेवा : कर्जत जामखेड मतदार संघातील सिंचन विहिरींच्या खोदाईसाठी येत असलेल्या अडचणी सोडवण्यासाठी आ.रोहित पवारांनी (MLA Rohit Pawar) भूजल राज्य सर्वेक्षण विकास व यंत्रणा विभागचे संचालक डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांची नुकतीच भेट घेतली.यावेळी झालेल्या चर्चेत भूजल सर्वेक्षण विभागाकडून अवलंबिण्यात येत असलेली कार्यपद्धती काही अंशी बदलण्यात येईल असे कलशेट्टी यांच्याकडून सांगण्यात आल्याने मतदारसंघातील 150 गावांचा प्रश्न मार्गी लागला आहे.(The problem of digging irrigation wells of Karjat-Jamkhed has been solved)

भूजल सर्वेक्षण विभागाने कर्जत व जामखेड मतदारसंघांमध्ये केलेल्या सर्वेक्षणानुसार व सिंचन विहिरी घेणेबाबत बदललेल्या कार्यपद्धतीमुळे मतदार संघातील खुप कमी गावे सिंचन विहिर योजनांसाठी पात्र ठरली होती. त्यामुळे उर्वरित इतर गावातील लाभार्थी सिंचन विहिर खोदाई योजनांपासून वंचित राहिले होते.(The problem of digging irrigation wells of Karjat-Jamkhed has been solved)

State Groundwater Survey Development and Systems Director Dr. MLA Rohit Pawar recently met Mallinath Kalashetti.
State Groundwater Survey Development and Systems Director Dr. MLA Rohit Pawar recently met Mallinath Kalashetti.

आ.पवार यांनी याबाबत भूजल सर्वेक्षण विभागाचे संचालक कलशेट्टी यांच्याशी समक्ष झालेल्या चर्चेत सिंचन विहिरी खोदण्याबाबत भूजल सर्वेक्षण विभागाकडून अवलंबिण्यात येत असलेली कार्यपद्धती काही अंशी बदलण्याचा निर्णय झाला. यामुळे कर्जत-जामखेड मतदारसंघातील अनेक गावांतील लाभार्थ्यांना सिंचन विहिरी खोदाईच्या योजनांचा लाभ मिळणार आहे. कर्जत तालुक्यातील एकूण ६२ गावे व जामखेड तालुक्यातील ८७ गावे या योजनांसाठी पात्र असणार आहेत.(The problem of digging irrigation wells of Karjat-Jamkhed has been solved)