Third wave of corona active in Ahmednagar district | जामखेड तालुक्यात कोरोना का वाढतोय ? जाणून घ्या सरपंचांनी सांगितलेली हि कारणे
जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले यांनी बुधवारी केला जामखेड तालुक्याचा दौरा
जामखेड टाईम्स वृत्तसेवा : जामखेड तालुक्यात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता बुधवारी जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले(Collector Rajendra Bhosale) यांनी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र क्षीरसागर, जिल्हा आरोग्य अधिकारी डाॅ संदिप सांगळे यांच्यासमवेत जामखेड तालुक्याचा दौरा केला.Third wave of corona active in Ahmednagar district
जामखेड तालुक्यातील फक्राबाद येथे पार पडलेल्या तालुकास्तरीय कोरोना आढावा बैठकीत जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले यांनी सरपंचांशी संवाद साधत जामखेड तालुक्यात कोरोना का वाढतोय ? याची कारणे जिल्हा प्रशासनाने बुधवारी जामखेड तालुक्यातील सरपंचांकडून जाणून घेतली.Third wave of corona active in Ahmednagar district
तरूणाईचा मुक्तसंचार, मास्क न लावता फिरणे, लग्नसोहळे, आखाड पार्ट्या, जत्रा, जागरण गोंधळ, कामगार वर्ग, दुध डेअरी, लिंबू आडती व विविध धार्मिक कार्यक्रमांमुळे कोरोना वाढत असल्याची बाब विविध गावच्या गावकारभाऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून दिली.Third wave of corona active in Ahmednagar district
आता तालुका प्रशासन जामखेड तालुक्यातील कोरोनाचा उद्रेक रोखण्यासाठी काय कठोर उपाययोजना राबवणार याकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे.Third wave of corona active in Ahmednagar district
टेस्टिंग न करता कोरोना बाधितांवर जे खाजगी रूग्णालये जामखेड तालुक्यात उपचार करत आहेत त्यांच्या कारवाई करावी असे आदेश जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले यांनी बुधवारी दिले. Third wave of corona active in Ahmednagar district
जामखेड तालुक्यात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता यापुढे कठोर निर्बंध लावले जातील असे सांगत ज्या गावांमध्ये कोरोनाबाधितांची संख्या वाढली आहे ती गावे तातडीने बंद ठेऊन तिथे कठोर उपाययोजना राबवा स्थानिक प्रशासनाला जे कुणी सहकार्य करत नाहीत त्यांच्यावर तालुका प्रशासनाने कठोर कारवाई करावी.ज्या गावातील व्यापारी, दुकानदार व इतर अस्थापना कोरोना नियमांचे पालन करण्यात सहकार्य करत नाहीत त्या तातडीने सीलबंद करा असे आदेश जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले यांनी बुधवारी जामखेड तालुका प्रशासनाला दिले.Third wave of corona active in Ahmednagar district
यावेळी झालेल्या बैठकीस प्रांताधिकारी अर्चना नष्टे, तहसिलदार विशाल नाईकवाडे, पोलिस निरीक्षक संभाजीराव गायकवाड, गटविकास अधिकारी परशुराम कोकणी, तालुका आरोग्य अधिकारी डॉ सुनिल बोराडे, वैद्यकीय अधिक्षक डाॅ संजय वाघ, मुख्याधिकारी मिनीनाथ दंडवते, डाॅ सदाफुले, सरपंच विश्वनाथ राऊत, पोलिस पाटील योगेश जायभाय,विविध गावांचे सरपंच, ग्रामसेवक व तलाठी यावेळी उपस्थित होते. Third wave of corona active in Ahmednagar district