आज निकाल : कुणाच्या अंगावर गुलाल ? कुणाचा पत्ता कट ? उत्सुकता शिगेला (Today’s result: Gulal on whose body? Whose address cut? Curiosity shrieked )
जामखेड टाईम्स वृत्तसेवा: जामखेड तालुक्यातील 39 ग्रामपंचायतीच्या मतमोजणीस अवघ्या तासाभरात सुरुवात होईल. यंदा तालुक्यातील एकूण 39 ग्रामपंचायतीमधील 299 जागांसाठी 714 उमेदवार रिंगणात होते. या सर्व उमेदवारांच्या भविष्याचा फैसला अवघ्या काही तासात लागणार आहे. यामुळे निकाल काय लागतो याचीच उत्सुकता शिगेला पोहचली आहे.
मतमोजणीस सकाळी आठ वाजता सुरूवात होणार आहे. मतमोजणी प्रक्रिया दहा राऊंडमध्ये पार पडणार आहे. मतमोजणीसाठी गावकारभारी व त्यांचे समर्थक आता जामखेडमध्ये दाखल होऊ लागले आहेत. मतमोजणी जामखेडच्या तहसिल कार्यालयात पार पडणार आहे. कुणाच्या अंगावर गुलाल ? कुणाचा पत्ता कट होणार याचीच उत्सुकता शिगेला लागली आहे.गावगाडा कुणाच्या ताब्यात जाणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.