जामखेड टाईम्स वृत्तसेवा: जामखेड तालुक्यातील सर्वात लक्षवेधी लढत पिंपरखेड हसनाबाद ग्रामपंचायतमध्ये रंगली होती. येथील निवडणुकीत ढवळे विरूध्द ढवळे या पारंपारिक सामन्यात तिसर्या पॅनलने एन्ट्री करत जोरदार चुरस निर्माण केली. याशिवाय एका प्रभागात स्वाभिमानी शेतकरी संघटनेने दोन उमेदवार उभे करत चौरंगी सामना घडवून आणला. यामुळे पिंपरखेडची निवडणुक सर्वात हाॅट बनली होती. (Who captured Pimparkhed? Curiosity shines; arithmetic is fast!)
पिंपरखेडमध्ये विद्यमान सरपंच बापुराव ढवळे, पंचायत समितीचे माजी उपसभापती अंकुश ढवळे, माजी उपसरपंच काशिनाथ ओमासे, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे युवक तालुकाध्यक्ष राहुल पवार यांच्या प्रतिष्ठेची यंदाची निवडणुक काल पार पडली. पिंपरखेडमध्ये 88.48% मतदान पार पडले.आता जनतेचा कौल कुणाच्या पारड्यात जाणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. सर्वांनी विजयाचे दावे केले असले तरी पिंपरखेडमध्ये सोयरे धायरे हा पक्ष किती प्रभावी ठरला, याशिवाय एका मताचा भावही हजारोत फुटला होता त्यातून कुणाचा गेम झाला हे मात्र निकाला नंतर स्पष्ट होईल. (Who captured Pimparkhed? Curiosity shines; arithmetic is fast!)
तुर्तास सर्व नेते, उमेदवार व समर्थक आता आकडेमोड करण्यात व्यस्त झाले आहेत. काहींचे पडलेले चेहरे बरेच काही सांगून जात आहेत.
प्रभाग निहाय मतदान खालील प्रमाणे
प्रभाग एक – 84.98% (498)
प्रभाग दोन – 86.64% (506)
प्रभाग तीन – 88.32% (658)
प्रभाग चार – 93.79% (574)
एकुण मतदान – 2527
झालेले मतदान – 2236
झालेले स्त्री मतदान – 997
झालेले पुरूष मतदान – 1239
मतदान टक्केवारी – 88.48%