जामखेड टाइम्स वृत्तसेवा । आमदार प्रा.राम शिंदे यांच्या पाठीशी सातत्याने राजकीय ताकद देण्याची भूमिका घेणाऱ्या जवळा गावासाठी आमदार प्रा राम शिंदे यांच्या पाठपुराव्यामुळे 20 कोटी रूपये खर्चाची जलजीवन पाणी योजना मंजुर झाली आहे. या योजनेचे नुकतेच भूमिपूजन पार पडले. जवळा ग्रामस्थांनी स्वयंस्फूर्तीने एकत्रित येत या कार्यक्रमाचे आयोजन केले होते.या कार्यक्रमासाठी महिला व पुरुष मोठ्या संख्येने उपस्थित होते.
जामखेड तालुक्यातील जवळा हे गाव राजकीयदृष्ट्या अतिशय महत्वपूर्ण असे गाव आहे. जवळा गावाने सातत्याने आमदार प्रा राम शिंदे यांच्या पाठीशी आपली राजकीय ताकद उभी केली आहे. आमदार प्रा राम शिंदे यांनीही विकास कामांमध्ये जवळा गावाला सातत्याने झुकते माप दिले आहे. जवळा आणि त्या अंतर्गत येणाऱ्या वाड्या वस्त्यांसाठी मोठी पाणी योजना असावी, अशी येथील ग्रामस्थांसह भाजपा पदाधिकाऱ्यांची मागणी होती.
या मागणीनुसार आमदार प्रा.राम शिंदे यांनी जवळा गावासाठी 20 कोटी रूपये खर्चाची पाणी योजना मंजुर व्हावी यासाठी सरकार दरबारी पाठपुरावा हाती घेतला होता. आमदार प्रा.राम शिंदे यांच्या पाठपुराव्यामुळे जवळा गावासाठी 20 कोटी रूपये खर्चाची पाणी योजना मंजुर झाली आहे. या योजनेचे जवळा ग्रामस्थांनी नुकतेच भूमिपूजन केले.
जवळा गावात जलजीवन योजनेचे काम सुरु झाल्यामुळे जवळा आणि वाड्या वस्त्यांवरील महिला वर्गात आनंदाचे वातावरण पसरले आहे.जवळेकरांसाठी अत्यंत जिव्हाळ्याचा पाणी प्रश्न आमदार प्रा.राम शिंदे यांनी मार्गी लावल्याबद्दल जवळा गावातील महिला वर्गातून आमदार राम शिंदे यांचे आभार मानले जात आहेत.