Free distribution | vegetable seeds | women farmers| महिला शेतकऱ्यांना भाजीपाला बियाण्यांचे मोफत वाटप

जामखेड टाईम्स वृत्तसेवा : जामखेड तालुक्यातील हळगाव येथे महिला शेतकऱ्यांना भाजीपाला बियाण्यांचे (Free distribution, vegetable seeds, women farmers,) शुक्रवारी वाटप करण्यात आले.हा कार्यक्रम येथील भैरवनाथ मंदिर परिसरात पार पडला.

 

(Free distribution, vegetable seeds, women farmers,)
महिला शेतकऱ्यांना भाजीपाला बियाण्यांचे वाटप

ग्रामीण भागातील महिला शेतकऱ्यांना आपल्या स्वता:च्या शेतामध्ये परसबाग निर्माण करून सेंद्रिय (organic) पद्धतीने भाजीपाला पिकवता यावा यासाठी महिला शेतकऱ्यांना भाजीपाला बियाण्यांचे वाटप हा कार्यक्रम घेण्यात आला या कार्यक्रमाला हाळगाव, पिंपरखेड व आघी येथील महिला शेतकरी उपस्थित होत्या. या तीन गावातील महिलांना भाजीपाला बियाण्यांचे मोफत वाटप करण्यात आले.

 

 

यावेळी तब्बसुम मोमीन, बाळासाहेब काळदाते, शिला भोजने, मंगेश आजबे, राहूल पवार, रोहिणी गिरी, उषाताई  झिंजाडे, मुक्ताताई ढवळे, मुमताज सय्यद, रेखाताई ढोले, अनिताताई वडेकर, पुनम ताई मस्के, दत्तात्रय साळुंखे, संजय ढोले, दादासाहेब पुराणे, आबासाहेब ढवळे, शरद ढवळे, तुकाराम लबडे इत्यादी मान्यवर उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन तुकाराम लबडे यांनी केले. आभार शरद ढवळे यांनी मानले.