तुम्ही सर्वजण रोहित दादाचे हात आहात म्हणूनच कोरोनाचा मृत्यू दर कमी !
सुनंदाताई पवार: अरणगावमध्ये कर्जत- जामखेड एकात्मिक विकास संस्थेच्या वतीने कर्मचाऱ्यांचा गौरव
जामखेड टाईम्स वृत्तसेवा :जामखेड तालुक्यातील अरणगाव प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये कार्यरत असलेल्या आरोग्य कर्मचारी व आशा सेविकांनी कोरोना काळात बजावलेल्या उत्कृष्ट कामगिरीबद्दल कर्जत जामखेड एकात्मिक विकास संस्था व आमदार रोहित पवार यांच्या वतीने शुक्रवारी अरणगावमध्ये कृतज्ञता सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.
आशा सेविका व आरोग्य कर्मचाऱ्यांनी कोरोना काळात आपला जीव धोक्यात घालून रुग्णांची निस्वार्थपणे सेवा केली. त्यांच्या या कार्याचे कौतुक करावे तेवढे कमीच आहे असे सांगत रोहित दादाचे तुम्ही सर्वजण हात आहात तुमच्या अथक परिश्रमातूनच जामखेड तालुक्यात कोरोनाचा मृत्यू दर कमी होता असे प्रतिपादन अॕग्रिकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्टच्या विश्वस्त सुनंदाताई पवार यांनी केले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षतेस्थानी बारामती अॕग्रिकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्टच्या विश्वस्त सुनंदाताई पवार ह्या होत्या. यावेळी पंचायत समितीच्या सभापती राजश्री मोरे,अरणगाव प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डाॅ सदाफुले सह आदी मान्यवर उपस्थित होते.यावेळी सुनंदाताई पवार व पंचायत समितीच्या सभापती राजश्री मोरे यांच्या हस्ते आशा सेविका व आरोग्य कर्मचाऱ्यांचा सत्कार करण्यात आला.
कर्करोग, तिरळे डोळे असणारी व्यक्ती आढळल्यास त्या व्यक्तीवर तातडीने उपचार व्हावेत यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत.आपल्या आसपास अश्या व्यक्ती असतील तर त्यांची माहिती आमदार रोहित दादांना द्या असे अवाहन सुनंदाताई पवार यांनी यावेळी केले.
यावेळी पुढे बोलताना सुनंदाताई पवार म्हणाल्या की, हा फक्त बक्षीस वितरण सोहळा नसून या माध्यमाद्वारे आशा सेविका व आरोग्य कर्मचाऱ्यांशी ओळख करून घेणे हा उद्देश होता. आरोग्य, स्वच्छता, आदी विषयांवर त्यांनी उपस्थितांशी संवाद साधला. कर्करोग, तिरळे डोळे असणारी व्यक्ती आढळल्यास त्या व्यक्तीवर तातडीने उपचार व्हावेत यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत.आपल्या आसपास अश्या व्यक्ती असतील तर त्यांची माहिती आमदार रोहित दादांना द्या असे अवाहन सुनंदाताई पवार यांनी यावेळी केले.