जिल्हा परिषद निवडणूक 2022 : जामखेड तालुका प्रारूप गट – गण रचना जाहीर, कुठल्या गणात – गटात कोणते गाव ? जाणून घ्या सविस्तर !
जामखेड टाईम्स वृत्तसेवा : आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणूक 2022 च्या अनुषंगाने जामखेड तालुक्यातील गट आणि गण रचना आज 2 जून रोजी जाहीर करण्यात आली
सदर गट आणि गण रचना 2011 च्या लोकसंखेच्या अनुषंगाने गृहीत धरून तयार करण्यात आली आहे. मागील 2017 च्या जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणूकमध्ये जामखेड तालुक्यात दोन गट आणि चार गण तयार करण्यात आले होते.
2017 साली अहमदनगर जिल्ह्यात एकूण 75 गट होते. 2022 च्या निवडणुकीसाठी गट संखेमध्ये दहाने वाढ होऊन 85 गट तयार करण्यात आले आहेत. त्यानुषंगाने जामखेड तालुक्यामध्ये 3 गट आणि 6 गण तयार करण्यात आले आहेत.
2011 च्या लोकसंखेप्रमाणे एकूण लोकसंख्या 118829 असून अनुसूचित जातीची लोकसंख्या 16066 आहे.तसेच अनुसूचित जमातीची लोकसंख्या 3092 इतकी आहे. यानुसार जामखेडमधील ३ गट आणि ६ गट खालीप्रमाणे आहेत.
गटाचे नाव : 83 साकत
गणाचे नाव : 165 साकत : साकत गणामध्ये साकत, कोल्हेवाडी, पिंपळवाडी, मोहा, सावरगाव, देवदैठण, नाहुली, धामणगाव, जायभायवाडी, दिघोळ, अशा एकूण 8 ग्रामपंचायती आणि 11 गावांचा समावेश होतो.
गणाचे नाव : १६६ शिऊर : या गणामध्ये शिऊर, नायगाव, तेलंगशी, मोहरी, राजुरी, डोळेवाडी, आनंदवाडी, सारोळा, काटेवाडी ,पाडळी, जातेगाव, खुरदैठण, बांधखडक अशा एकूण 11 ग्रामपंचायती आणि 13 गावांचा समावेश होतो.
गटाचे नाव : 84 जवळा
गणाचे नाव : 167 जवळा : या गणात कवडगाव, गिरवली, पिंपरखेड, हसनाबाद, बावी, हाळगाव, चौंडी, आघी, मतेवाडी, जवळा, राजेवाडी, धोंडपारगाव अशा एकूण 10 ग्रामपंचायती आणि 12 गावांचा समावेश होतो.
गणाचे नाव : 168 अरणगाव : या गणात अरणगाव, पारेवाडी, डोणगाव, फक्राबाद, पाटोदा, खामगाव, भवरवाडी, रत्नापूर, सांगवी, कुसडगाव, सरदवाडी, खांडवी, डिसलेवाडी, धानोरा, वंजारवाडी, झिक्री अशा एकूण 9 ग्रामपंचायती आणि 16 गावांचा समावेश होतो.
गटाचे नाव : ८५ खर्डा
गणाचे नाव : १६९ खर्डा : या गणात खर्डा, नागोबाचीवाडी, मुंगेवाडी, पांढरेवाडी, दरडवाडी, लोणी, आपटी, वाकी, बाळगव्हाण, सातेफळ, पिंपळगाव आळवा, घोडेगाव अशा एकूण 8 ग्रामपंचायती आणि 12 गावांचा समावेश होतो.
गणाचे नाव १७० नान्नज : या गणामध्ये नान्नज, पोतेवाडी, वाघा, पिंपळगाव उंडा, तरडगाव, वंजारवाडी, दौन्डाचीवाडी, सोनेगाव, जवळके, धनेगाव, चोभेवाडी, मुन्जेवाडी, बोर्ले, गुरेवाडी, महारुळी अशा एकूण 12 ग्रामपंचायती आणि 15 गावांचा समावेश होतो.
सदर गट गण रचनेबाबत कुणाला हरकती असल्यास 2 जून ते 8 जून या कालावधीत आपल्या हरकती जिल्हाधिकारी कार्यालय अहमदनगर येथे जिल्हा पुनर्वसन अधिकारी यांचेकडेस दाखल कराव्यात .त्यानंतर आलेल्या हरकतींचा विचार केला जाणार नाही. हरकत घेण्यासाठी प्रमाणित कागदपत्रे जिल्हाधिकारी कार्यालय ग्रामपंचायत शाखा यांचे जवळ मिळतील याची सर्वांनी नोंद घ्यावी असे अवाहन तहसीलदार योगेश चंद्रे यांनी केले आहे.