Agricultural electric water pump | कृषीपंपाच्या मोटारी चोरणारा 01 चोरटा गजाआड !
जामखेड पोलिसांची धडाकेबाज कारवाई
जामखेड टाईम्स वृत्तसेवा | जामखेड तालुक्यात सातत्याने कृषीपंपाच्या इलेक्ट्रिक मोटारी (Agricultural electric water pump) चोरीच्या घटना घडत आहेत. यात शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान होत आहे. कृषीपंपाच्या इलेक्ट्रिक मोटारी चोरणाऱ्या चोरांच्या मुसक्या आवळण्यासाठी सरसावलेल्या जामखेड पोलिसांच्या तपास पथकाला मंगळवारी मोठे यश आले आहे.
जामखेड तालुक्यातील अरणगाव येथून कृषीपंपाच्या इलेक्ट्रिक मोटारी (Agricultural electric water pump) चोरणाऱ्या चोरट्याला गजाआड करण्यात आले आहे. त्याच्याकडून कृषीपंपाच्या दोन इलेक्ट्रिक मोटारी हस्तगत करण्यात आल्या आहेत. (Thief arrested for stealing electric pump From Arangaon in Jamkhed taluka)
जामखेड तालुक्यातील अरणगाव येथील शेतकरी मोहन रामदास कारंडे यांच्या गट नंबर ८१ मध्ये असलेल्या विहिरीवरून ०२ इलेक्ट्रिक मोटारी (Agricultural electric water pump) चोरीस जाण्याची घटना जुन महिन्यात घडली होती. त्यानुसार कारंडे यांच्या फिर्यादीवरून जामखेड पोलिस स्टेशनला (jamkhed police Station) गुन्हा रजिस्टर क्रमांक २८६/२०२१ अन्वये कलम ३७९ प्रमाणे दिनांक २१ जुन २०२१ रोजी अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता.
सदर गुन्ह्याचा जामखेड पोलिसांकडून तपास (Investigation by Jamkhed Police) सुरूअसतानाच अरणगाव (Arangaon in Jamkhed taluka) येथील अमोल नाना निगुडे या इसमाने कारंडे यांच्या विहीरीतून इलेक्ट्रिक मोटारी (Agricultural electric water pump) चोरल्या आहेत अशी बातमी जामखेडचे पोलिस निरीक्षक संभाजीराव गायकवाड (Jamkhed police inspector Sambhajirao Gaikwad) यांना खबऱ्याकडून मिळाली.
त्यानुसार जामखेड पोलिसांनी मंगळवारी अरणगाव येथे छापा टाकत अमोल निगुडे याच्या मुसक्या आवळल्या. पोलिसांनी पोलिसी खाक्या दाखवताच निगुडे याने गुन्ह्याची कबुली देत दोन इलेक्ट्रिक मोटारी (Agricultural electric water pump) पोलिसांच्या ताब्यात दिल्या.पोलिसांनी त्याला अटक केली आहे.
कृषीपंपाच्या इलेक्ट्रिक मोटारी (Agricultural electric water pump) चोरी प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस नाईक अजहरोद्दीन सय्यद हे करत आहेत.ही कारवाई पोलीस निरीक्षक संभाजीराव गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली गुन्हे शोध पथकाचे पोलीस उपनिरीक्षक राजू थोरात, पोलिस नाईक अविनाश ढेरे,पोलिस काँस्टेबल आबासाहेब आवारे, संग्राम जाधव, संदीप राऊत, अरुण पवार, विजय कोळी यांनी केली आहे.