Breaking News : जामखेड पोलिसांनी उचलले मोठे पाऊल, राजकीय पक्षांच्या सोशल मीडिया वीरांनो सावधान, कारण काय? जाणून घ्या !

जामखेड टाइम्स वृत्तसेवा । सत्तार शेख । लोकसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर सर्वच राजकीय पक्ष, नेते आणि कार्यकर्ते कमालीचे सक्रीय झाले आहेत.त्यातच आता सोशल मीडियावर राजकीय धुराळा उडू लागला आहे. वैयक्तिक टीका टिप्पणींचा महापुर आला आहे. सत्ताधारी विरूध्द विरोधक हा सामना चांगलाच तापला आहे. टीका टिप्पणीची पातळी घसरू लागली आहे. यामुळे राजकीय वादाच्या घटना घडण्याच्या शक्यता आहेत.अश्यातच जामखेड पोलिसांनी मोठे पाऊल उचलले आहे. जामखेड पोलिस ॲक्शन मोडवर आल्याने आता सावध होण्याची आवश्यकता आहे.

breaking news, Beware social media heroes of political parties, Jamkhed police has taken big step What is the reason? find out, Jamkhed Police has issued notice to social media users

सोशल मीडियावर आपल्या पक्ष, संघटना आणि नेत्यांच्या समर्थनार्थ राजकीय पोस्ट टाकणाऱ्या सोशल मीडिया वीरांना निवडणूका संपेपर्यंत मोठी खबरदारी घ्यावी लागणार आहे. सोशल मीडियावर टाकलेल्या पोस्टमुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही याची काळजी राजकीय नेत्यांसह त्यांच्या कार्यकर्त्यांना यापुढे घ्यावी लागणार आहे. कारण जामखेड पोलिसांनी याबाबत एक नोटीस जारी केली असून याद्वारे सर्वच राजकीय पक्ष आणि संघटनांच्या नेते आणि कार्यकर्त्यांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. त्याबरोबर सोशल मीडिया ॲडमीन आणि सदस्यांनाही सावधानतेचा इशारा जारी केला आहे.

जामखेड पोलिसांनी जारी केलेल्या नोटीसमध्ये नेमकं काय म्हटलंय? पाहूयात

ज्याअर्थी जामखेड पोलीस स्टेशन हददीतील कायदा व सुव्यवस्थेस बाधा निर्माण होणार नाही, याबाबत खबरदारी घेणे पोलीसांचे कर्तव्य असुन मी पोलीस निरीक्षक, जामखेड पोलीस स्टेशन, जि. अहमदनगर मला प्रदान असलेल्या अधिकाराचा वापर करुन खालील प्रमाणे नोटीस देत आहे.

व्हॉटसअप ग्रुप ॲडमीन, ग्रुप मधील सदस्य तसेच फेसबुक वापरकर्त्यांना सुचित करण्यात येते की, आपण सोशल मीडिया ॲडमिन व सदस्य आहात तसेच आपण फेसबुक वापरतात तरी आपण सोशल मीडिया ग्रु वर वैयक्तिक टीका टिप्पणी करणारे पोस्ट शेयर करणार नाहीत.आपण आपल्या पक्षाची, संघटनेची विचारधारा, ध्वेयधोरणे, पक्षाची / संघटनेची कामे याविषयी माहिती सोशलमिडीयावर प्रसारीत करीत असतात. ही माहिती सोशल मिडीयावर प्रसारीत करीत असताना एखाद्या पक्षाविषयी, एखाद्या व्यक्तीविषयी द्वेष उत्पन्न होईल किंवा दोन व्यक्तीमध्ये तेढ निर्माण होईल अशी वक्तव्ये फोटो, व्हिडीओ सोशलमिडीयावर प्रसारीत करणार नाहीत.

तरी आपणाकडुन अशा प्रकारची पोस्ट, फोटो, किंवा व्हिडीओ सोशलमिडीयावर प्रसारीत होवुन आपणाकडुन दखलपात्र अपराध घडल्यास अथवा कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास आपणास जबाबदार धरुन आपणाविरुध्द प्रचलित कायदयान्वये कायदेशिर कारवाई करण्यात येईल. व सदरची नोटीस पुरावा म्हणून मा. न्यायालयात सादर केली जाईल. याची नोंद घ्यावी.

महेश पाटील
पोलीस निरीक्षक
जामखेड पोलीस स्टेशन

shital collection jamkhed