ब्रेकिंग न्यूज : वाॅटर सप्लायची मोटार चालू करण्यासाठी गेलेल्या ग्रामपंचायत शिपायाचा पाण्यात बुडून मृत्यू, जामखेड तालुक्यातील घटना !

जामखेड टाइम्स वृत्तसेवा : वाॅटर सप्लायची मोटार चालू करण्यासाठी गेलेल्या ग्रामपंचायत शिपायाचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना आज १२ रोजी घडली आहे. जामखेड तालुक्यातील पिंपळगाव आवळा (Pimpalgaon aawala) येथील बापू विश्वनाथ खवळे (वय ४१) (Bapu Vishwanath Khawale) यांचा या घटनेत मृत्यू झाला. हि घटना घोडेगाव तलाव परिसरात घडली. या घटनेमुळे तालुक्यात मोठी खळबळ उडाली आहे.

BREAKING NEWS, Gram panchayat workers Bapu Vishwanath Khawale drowns in water after going to start water supply motor, incident in aawala by jamkhed taluka

जामखेड तालुक्यातील पिंपळगाव आवळा ग्रामपंचायतमध्ये शिपाई म्हणून कार्यरत असलेले बापू विश्वनाथ खवळे हे आज १२ रोजी सकाळी ८ वाजता ग्रामपंचायतच्या वाॅटर सप्लायची मोटार चालू करण्यासाठी घोडेगाव तलावावरील विहिरीवर गेले होते. ते लवकर घरी न आल्यामुळे त्यांचा मुलगा सागर खवळे हा त्यांना पाहण्यासाठी घोडेगाव तलावावर गेला असता त्यांचे कपडे तलावाकाठी असल्याचे त्याच्या निदर्शनास आले.

यानंतर सागर खवळे याने सरपंच बाबासाहेब मोहिते, दत्तात्रय बारवकर, बलभीम बारवकर, नितीन खवळे, लक्ष्मण खवळे, सागर खवळे, अतुल खवळे, किरण खवळे, किसन गव्हाळे, भरत साठे, अशोक पवार यांच्या मदतीने वडिल बापू खवळे यांचा शोध घेतला असता ते ग्रामपंचायतच्या वॉटर सप्लाय करणाऱ्या विहीरीपाशी बेशुध्द अवस्थेत पडले असल्याचे आढळून आले. त्यानंतर त्यांना पाण्यातून बाहेर काढत उपचारासाठी जामखेड ग्रामीण रूग्णालयात दाखल करण्यात आले. परंतू उपचारापुर्वीच त्यांचा मृत्यू झाला असल्याचे यावेळी डाॅक्टरांनी घोषित केले.

BREAKING NEWS, Gram panchayat workers Bapu Vishwanath Khawale drowns in water after going to start water supply motor, incident in  pimpalgaon aawala by jamkhed taluka, Pimpalgaon aawala news, jamkhed latest news today,

जामखेड तालुक्यातील बाळगव्हाण येथील मयताचे मेव्हणे भाऊसाहेब कचरू पौडमल (वय ३१) यांनी खर्डा पोलिसांना सदर घटनेची खबर दिली. त्यानुसार खर्डा पोलीस स्टेशनला भारतीय नागरिक सुरक्षा संहिता कलम १९४ प्रमाणे आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

जामखेड ग्रामीण रूग्णालयात मृतदेहाची उत्तरीय तपासणी करण्यात आली. त्यानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. गुरुवारी सायंकाळी अत्यंत शोकाकुल वातावरणात मयत बापू खवळे यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

मयताचे मेव्हणे भाऊसाहेब पौडमल यांनी दिलेल्या खबरीत नेमकं काय म्हटलयं ?

माझे दाजी बापु विश्वनाथ खवळे हे ग्रामपंचाय कार्यालय पिंपळगाव आवळा येथे शिपाई म्हणुन काम करत होते. आज १२ सप्टेंबर २०२४ रोजी सकाळी ८च्या सुमारास ग्रामपंचायतची पाणी पुरवठा करणारी इलेक्ट्रीक मोटार चालु करण्यासाठी ते घोडेगाव तलावावर गेले होते. परंतु दाजी बापु खवळे हे लवकर घरी परत न आल्यामुळे १० वाजण्याच्या सुमारास त्यांचा मुलगा सागर हा वडील घरी आले नाही म्हणुन त्यांना पाहायला घोडेगाव तलावावर गेला होता.

त्यावेळी त्याला दाजी बापु खवळे यांचे कपडे पाण्याच्या कडेला दिसल्याने त्याने त्याच्या मित्रांना बोलावुन त्यांचा पाण्यामध्ये शोध घेतला असता दाजी हे ग्रामपंचायतची वॉटर सप्लाय करणारे विहीरीपाशी बेशुध्द अवस्थेत पडले होते. तेव्हा त्यांनी दाजी बापु खवळे यांना खाजगी वाहनाने ग्रामीण रुग्णालय जामखेड येथे उपचाराकरिता घेवुन गेले असता तेथील डॉक्टरांनी त्यांची तपासणी करुन दाजी बापु विश्वनाथ खवळे पिंपळगाव आवळा ता. जामखेड हे औषध उपचारापुर्वीच मयत झाल्याचे सांगितले, अशी खबर खर्डा पोलिस स्टेशनला देण्यात आली आहे. त्यानुसार खर्डा पोलिस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

या घटनेचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय जंजाळ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक धामणे एचडी व पोलीस अमलदार प्रवीण थोरात हे करत आहेत. सदर घटना कशी घडली ? घटनेवेळी नेमकं काय घडलं ? याचा उलगडा पोलिस तपासानंतरच समोर येईल. पिंपळगाव आवळा येथे घडलेल्या या दुर्दैवी घटनेमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.