घरफोडीच्या घटनांनी खर्डा शहर हादरले : जनतेत पसरली घबराट (A swarm of thieves in Kharda; Burglary in 5 places in one night)
जामखेड टाईम्स वृत्तसेवा : जामखेड तालुक्यात पुन्हा एकदा चोरट्यांनी डोके वर काढले आहे. ग्रामीण भागात चोरट्यांचा सुळसुळाट वाढला आहे. मागील आठवड्यात तालुक्यातील पाडळी, बांधखडक, मोहरी जामखेड शहर या ठिकाणी चोरीच्या घटना घडल्या होत्या. या घटनांमध्ये जवळपास सात लाखांचा ऐवज चोरीस गेला होता. त्यातच नान्नज व खर्ड्यात घरफोडीच्या घटना घडल्या आहेत. रविवारी खर्डा शहरात पाच ठिकाणी घरफोड्या तर दोन ठिकाणी मोटारसायकल चोरीचे प्रयत्न झाले. खर्ड्यात एकाच रात्री पाच ठिकाणी घरफोड्या झाल्याने जनतेत भीतीचे वातावरण पसरले आहे. (A swarm of thieves in Kharda; Burglary in five places in one night)
सविस्तर असे की,रविवारी रात्री खर्डा शहरातील कसाब गल्लीतील शेख चांद अब्दुल शेख यांच्या घरातील नऊ हजार रुपये रोख रक्कम, शुक्रवार पेठेतील सविता बाळासाहेब खरात यांच्या घरातील 49 हजाराची रोख रक्कम चोरट्यांनी घरफोडी करत चोरून नेली आहे. त्याचबरोबर खर्ड्यातील सुर्वे गल्ली येथील बाळासाहेब जनार्दन वाळुंजकर, सुरेश राजाराम ढेरे, भगवान बापूराव पन्हाळकर यांच्या बंद घराचे कुलपे तोडून सामानाची उचका पाचक करुन घरातील सामान फेकून चोरट्यांनी पोबारा केला. (A swarm of thieves in Kharda; Burglary in five places in one night)