जामखेड पोलिसांचा कारवाईचा धडाका सुरूच : सहा जुगाऱ्यांविरोधात गुन्हे दाखल (Charges filed against six gamblers)
जामखेड टाईम्स वृत्तसेवा: जामखेड पोलिसांनी खर्ड्यातील जुगार अड्ड्यावर धाड टाकत सहा जुगाऱ्यांना ताब्यात घेण्याची कारवाई केली आहे. या सर्वांवर गुन्हे दाखल करण्यात आले असुन सुमारे 25 हजाराचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. (Charges filed against six gamblers)
पोलिस सुत्रांकडून मिळालेली माहिती अशी की, जामखेड तालुक्यातील खर्डा भागात जुगार अड्डा सुरू असल्याची बातमी मिळाल्यानंतर जामखेड पोलिसांच्या पथकाने खर्डा गावात आज 12 रोजी धाड टाकत सहा जुगाऱ्यांना ताब्यात घेण्याची कारवाई केली. या कारवाईत सुमारे 25 हजार रुपये रोख रक्कम व जुगाराचे साहित्य जप्त करण्यात आले आहे. जामखेड पोलिसांत गोरख बबन खोबरे, सुरज तेजसिंग भागडे , प्रविण बबन राऊत ( सर्व राहणार खर्डा) पद्माकर पांडुरंग काळे (धनेगाव ), महाविर बबन तादगे ( रा दौंडाचीवाडी) बापु भास्कर पवार ( रा अंतरवली भूम) या सहा जणांविरोधात जुगार कायद्यान्वे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. दरम्यान अटक करण्यात आलेल्या या सहा जुगाऱ्यांना वैयक्तिक जातमुचलक्यावर सोडून देण्यात आले.दरम्यान जामखेड पोलिसांनी अवैध्य व्यवसायासह जुगार अड्ड्याविरोधात कारवाईचा धडाका सुरू ठेवल्याने अनेकांचे धाबे दणाणले आहेत.
पोलिस निरीक्षक संभाजीराव गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आलेल्या कारवाईच्या पथकात सहाय्यक पोलिस निरीक्षक महेश जानकर, हेडकॉन्स्टेबल नवनाथ भिताडे, शिवाजी भोस, पोलीस कॉन्स्टेबल अविनाश ढेरे, विजयकुमार कोळी, संदीप राऊत, आबासाहेब आवारे, अरुण पवार सचिन राठोड यांचा समावेश होता.