धक्कादायक : रस्ता कामाची तक्रार पडली भलतीच महागात; तक्रारदाराचे अख्खे कुटूंबच बदडले.. (Complaint of road work cost the entire family of the complainant )
जामखेड टाईम्स वृत्तसेवा : रस्ता कामाची जिल्हाधिकारी अहमदनगर यांच्याकडे तक्रार का दिली असे म्हणत एका गटाने तक्रारदाराचे अख्खे कुटूंबच बदडून काढण्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. तर दुसरीकडे निवडणूकीत आमच्या विरोधात काम का केले असे म्हणत एका गटाने दुसर्या गटावर हल्ला केल्याची घटना घडली आहे. दोन्ही घटना जामखेड तालुक्यातील मोहा गावात घडल्या आहे. रस्त्याचे काम व ग्रामपंचायत निवडणुकीचा वाद यातूनच मोहा गावात दोन गटात उसळलेल्या दंगलीत पाच जण जखमी होण्याची घटना घडली आहे. याप्रकरणी जामखेड पोलिस स्टेशनला शनिवारी दोन्ही गटातील एकुण तीस जणांविरोधात मारहाणीचे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. ( Shocking: Complaint of road work cost the entire family of the complainant )
याबाबत सविस्तर असे की, जामखेड तालुक्यातील मोहा येथील शिवाजी त्रिंबक डोंगरे, वामन आत्माराम डोंगरे, प्रदिप आत्माराम डोंगरे, मारुती रघुनाथ डोंगरे, बाळु रघुनाथ डोंगरे, नवनाथ बाळु डोंगरे, रमेश मारुती डोंगरे, उमेश मारुती डोंगरे, बाबासाहेब वामन बांगर,केदार वामन बांगर,हर्षल बाळासाहेब डोंगरे,देविदास महादेव गर्जे, ज्ञानेश्वर महादेव गर्जे, मारुती गोविंद बेलेकर, वसंत दत्तात्रय झेंडे, छाया आत्माराम डोंगरे, स्वाती वामन डोंगरे, उर्मिला प्रदिप डोंगरे, मनिषा मारुती डोंगरे, महादेव प्रल्हाद गर्जे, मुक्ताबाई महादेव गर्जे (सर्व रा मोहा, ता.जामखेड) हे सर्व जण जमावाने फिर्यादी संदीप ज्ञानदेव डोंगरेे वय 28 वर्ष, धंदा वेल्डींग दुकान, रा. मोहा, ता.जामखेड याच्या राहते घरासमोर गेले. यावेळी ते सोमिनाथ डोंगरे यास म्हणाले की, तु आम्ही करीत असलेल्या रोडच्या कामाच्या विरोधात जिल्हाधिकारी यांच्याकडे तक्रार का केली असे म्हणत लाकडी दांडक्याने, दगडाने व लाथाबुक्याने बेदम मारहाण करत जर तुम्ही रस्त्याच्या कामासंबंधी केलेला तक्रारीचा अर्ज परत घेतला नाही तर एकेकाचा काटा काढू असा दम या जमावाने फिर्यादी व त्यांच्या सहकार्यांना भरला. रस्ता कामाची जिल्हाधिकारी अहमदनगर यांच्याकडे तक्रार का दिली असे म्हणत एका गटाने तक्रारदाराचे अख्खे कुटूंबच बदडून काढण्याची धक्कादायक घटना शुक्रवारी घडली होती. या घटनेत संदिप डोंगरे व सोमिनाथ डोंगरे यांच्या कुटूंबियांना बेदम मारहाण करण्यात आली होती. या प्रकरणी जामखेड पोलिस स्टेशनला भादवि कलम 324, 452, 323, 504, 506, 143, 147, 148,149 प्रमाणे 21 जणांविरोधात फिर्याद दाखल झाली आहे. (Shocking: Complaint of road work cost the entire family of the complainant )
तर दुसर्या घटनेत ग्रामपंचायत निवडणूकीत आमच्या विरोधात काम का केले असे म्हणत एका गटाने दुसर्या गटावर हल्ला केल्याची घटना मोहा गावात घडली आहे. याप्रकरणी जामखेड पोलिस स्टेशनला वामन आत्माराम डोंगरे वय 32 वर्ष धंदा शेती, रा. मोहा, ता. जामखेड याने दाखल केलेल्या फिर्यादीवरून संदीप ज्ञानदेव डोंगरे , सदाशिव ज्ञानदेव डोंगरे, ज्ञानदेव नामदेव डोंगरे , सोमीनाथ श्रीधर डोंगरे,अशोक रामचंद्र दहिफळे, अभिनंदन सुरेश डोंगरे, बाळु महादेव घुमरे लहुराज दिवीचंद डोंगरे या सात जणांविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. याप्रकरणी दाखल झालेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, फिर्यादी हे त्यांच्या राहत्या घरासमोर आपल्या सहकार्यांसमवेत बसलेले असताना आरोपींनी अचानक फिर्यादीस लाथाबुक्याने मारहाण करायला सुरुवात केली. त्यावेळी फिर्यादी हे त्यांना काय झाले असे विचारत असताना तु ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये देविचंद वामन डोंगरे यांच्या विरुध्दात काम का केले, तुला जास्त माज आला आहे. तुझा काटा काढतो असे म्हणुन आरोपींनी फिर्याद व त्यांच्या सहकार्यांना बेदम मारहाण केली. या प्रकरणी जामखेड पोलिस स्टेशनला फिर्यादी वामन अत्माराम डोंगरे याने दाखल केलेल्या फिर्यादीवरून सात जणांविरोधात भादवि कलम 324, 323, 504,506, 143, 147, 148, 149 या कलमान्वये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. या प्रकरणाचा पुढील तपास पोलिस नाईक संजय लाटे हे करत आहेत. (One group attacked another, saying why they were working against the Gram Panchayat elections )