चालत्या बसमध्ये वृध्द प्रवाश्याचा मृत्यू : जामखेड तालुक्यात उडाली मोठी खळबळ (Elderly passenger dies in moving bus: Sensation erupts in Jamkhed taluka)

जामखेड टाईम्स वृत्तसेवा :  चालत्या बसमध्ये एका वृध्द प्रवाशाचा मृत्यू होण्याची घटना शनिवारी सकाळी उघडकीस आली.या घटनेने तालुक्यात मोठी खळबळ उडाली आहे. (Elderly passenger dies in moving bus: Sensation erupts in Jamkhed taluka)

याबाबत सविस्तर असे की,  बारामतीहून भूमला जाणार्या एसटी बसमध्ये आष्टी तालुक्यातील खडकत येथून महादेव नामा शिंदे ही वयोवृध्द व्यक्ती पाटोद्याला जाण्यासाठी बसली होती. बस पाटोदा (ग) या गावात आल्यानंतर बसवाहकाने त्या वृध्दास आवाज दिला परंतु त्या वृध्द व्यक्तीने काहीच प्रतिसाद दिला नाही. बसवाहक चैतन्य फटाले यांनी बसमधील पाठीमागील बाजूस जाऊन त्या वृध्द प्रवाश्यास पाहिले असता त्याच्या तोंडाला फेस आला होता.

एम एच 14 बी. टी. 1577 या बारामती – भूम एसटी बसचे बसचालक राजाराम नागरगोजे  बसवाहक चैतन्य फटाले यांनी पाटोदा (ग) येथील नागरिकांना बोलावून सदर व्यक्ती तुमच्या गावातील आहे का ? अशी विचारपुस केली. परंतु ती व्यक्ती आमच्या गावातील नाही असे गावकर्यांनी सांगितले. त्यानंतर तातडीने बस जामखेड पोलिस स्टेशनला नेण्यात आली. जामखेड पोलिसांनी त्या वृध्द प्रवाश्याला जामखेडच्या ग्रामीण रूग्णालयात उपचारासाठी दाखल केले. परंतु त्या वृध्द प्रवाश्याचा उपचारापुर्वीच मृत्यू झाला होता असे डाॅ शशांक शिंदे यांनी घोषित केले.

मृत झालेल्या वृध्द व्यक्तीची ओळख पटवण्याचे काम जामखेड पोलिस वेगाने हाती घेतले होते.अखेर जामखेड पोलिसांनी हाती घेतलेल्या तपासाला अवघ्या काही तासात यश आले. बारामती भूम बसमध्ये मृत झालेली वृध्द व्यक्ती आष्टी तालुक्यातील खडकत येथील रहिवासी असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्या मृत वृध्द प्रवाश्याचे नाव महादेव नामा शिंदे असे आहे. दरम्यान मृत शिंदे यांच्यावर जामखेडच्या ग्रामीण रूग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले. त्यानंतर मृतदेह नातेवाइकांच्या ताब्यात देण्यात आला आहे. पुढील तपास जामखेडचे पोलिस निरीक्षक संभाजीराव गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस नाईक अजय साठे हे करत आहेत.