fake milk 2118 | पोलिस निरीक्षक संभाजीराव गायकवाड यांची ‘दबंगगिरी’ आली चर्चेत : बनावट दुध बनवण्याचे दोन अड्डे उध्वस्त !

जामखेड टाईम्स वृत्तसेवा ( सत्तार शेख ) अहमदनगर पोलिस दलात बेधडक कारवायांसाठी प्रसिध्द असलेल्या पोलिस निरीक्षक संभाजीराव गायकवाड यांनी बनावट दुधाचा गोरखधंदा करणाऱ्या पांढऱ्या दुधातील काळ्या बोक्यांचे साम्राज्य मोडीत काढण्यासाठी मोठी मोहिम हाती घेतली आहे. जामखेडच्या खर्डा भागातील बनावट दुधाच्या गोरधंद्याचा त्यांनी पर्दाफाश केला आहे. या कारवाईमुळे पोलिस निरीक्षक संभाजीराव गायकवाडांची ‘दबंगगिरी’ पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. तर या कारवाईमुळे जामखेड तालुक्यातील ‘त्या’ बोक्यांचे आता भलतेच धाबे दणाणले आहेत.

जामखेड तालुक्यातील खर्डा (Kharda) भागातून बनावट दुध (Fake milk) तयार करण्याचे मोठे रॅकेट जामखेड पोलिसांनी उघडकीस आणले आहे. खर्डा व नागोबाचीवाडी येथील बनावट दुध बनवण्याचे ०२ अड्डे उध्वस्त करत सुमारे २११८ लिटर बनावट दुध (counterfeit milk) नष्ट करण्यात आले आहे. या कारवाईत तब्बल०२ लाख रूपये किमतीचे बनावट दुध बनवण्याचे साहित्यही जप्त करण्यात आले आहे. (Seizure of counterfeit milk making material)

याबाबत सविस्तर असे की, जामखेड तालुक्यातील नागोबाचीवाडी येथील हरिभाऊ एकनाथ गोपाळघरे यांच्या मालकीच्या खर्डा व नागोबाचीवाडी येथील भगवानकृपा दुध संकलन केंद्रावर (Kharda – Nagobachiwadi) बनावट दुध (Fake milk) तयार केले जात असल्याची गुप्त बातमी पोलिस निरीक्षक संभाजीराव गायकवाड यांना मिळाली होती.या बातमीची खातरजमा होताच जामखेड पोलिसांनी तातडीने दि २८ जुलै रोजी सकाळीच अन्न व औषध प्रशासनाच्या पथकाला सोबत घेत खर्डा भागात संयुक्त छापे टाकले.

जामखेड तालुक्यातील खर्डा भागातील नागोबाचीवाडी येथून ८७८ लिटर तर खर्डा येथून १२४० लिटर असा एकुण २११८ लिटर बनावट दुधाचा (Fake milk) मोठा साठा हस्तगत केला. (Fake milk seized in Kharda of Jamkhed taluka) तर एक लाख नव्वद हजार किमतीचे बनावट दुध तयार करण्याची पावडर, केमिकल, व अन्य साहित्याचा साठा घरातून व दुध संकलन केंद्रातून जप्त करण्यात आला आहे.

पहा कारवाईचे Exclusive दृश्य

अन्न व औषध प्रशासनाने जप्त केलेले बनावट दुध (Fake milk) जागेवर नष्ट केले आहेत. तर बनावट दुध तयार करण्यासाठी वापरलेले साहित्य अन्न औषध प्रशासनाने ताब्यात घेतले आहे.बनावट दुध तयार करण्याचे जप्त केलेल्या साहित्याचे नमुने पुढील तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठवण्यात आल्याची माहिती अन्न सुरक्षा अधिकारी उमेश सुर्यवंशी यांनी दिली.

(Fake milk) या धडाकेबाज कारवाईच्या पथकात पोलिस निरीक्षक संभाजीराव गायकवाड पोलिस उपनिरीक्षक राजु थोरात, अन्न व औषध प्रशासनाचे अन्न सुरक्षा अधिकारी उमेश सुर्यवंशी,  तसेच जामखेड पोलिस स्टेशनचे पोलिस नाईक अविनाश ढेरे, पोलिस काँस्टेबल आबासाहेब आवारे, विजयकुमार कोळी, अरूण पवार, संदिप राऊत, महिला पोलिस काँस्टेबल कोमल भुंबे सह आदींचा सहभाग होता.अन्न व औषध विभागाचे सहायक आयुक्त एस पी शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली अन्न व औषध प्रशासनाने ही कारवाई पार पाडली आहे.(Fake milk)

जामखेड तालुक्यात पांढर्‍या दुधातील (Fake milk) काळ्या बोक्यांचे साम्राज्य उध्वस्त करण्यासाठी अन्न व औषध विभागाने जामखेड पोलिसांच्या मदतीने मोठी कारवाई हाती घेण्याची आवश्यकता आहे.

खर्डा व नागोबाचीवाडी येथे तयार होणारे बनावट दुध (Fake milk) कुठे जात होते ? जामखेड शहरात तर याचा पुरवठा होत नव्हता ना ? या काळ्या धंद्यात आणखीन किती जणांचा सहभाग आहे ? यासह अन्य प्रश्नांची उत्तरे अन्न व औषध विभागाला खोदून काढावी लागतील हे मात्र निश्चित!