जामखेड टाइम्स वृत्तसेवा : जामखेड तालुक्यातील खर्डा भागात पोलिस स्टेशन व्हावे ही गेल्या अनेक वर्षांपासूनची मागणी आमदार रोहित पवार यांच्या पाठपुराव्याने मार्गी लागली. खर्डा पोलिस स्टेशन आजपासून कार्यान्वित झाले आहे.या पोलिस स्टेशनची धुरा सहाय्यक पोलिस निरीक्षक प्रकाश पाटील यांच्याकडे असणार आहे. (Jamkhed, Kharda police station operational from today )
खर्डा पोलिस स्टेशन निर्मितीचा मुद्दा सातत्याने अनेक वर्षे निवडणुकांमध्ये गाजत असायचा. खर्डा परिसरातील वाढता क्राईम रेट पाहता या भागात स्वतंत्र पोलिस ठाण्याची आवश्यकता होती. याच मागणीचा विचार करून आमदार रोहित पवार यांनी गृहमंत्र्यांकडे खर्डा पोलिस स्टेशनची मागणी लावून धरली होती.
कर्जतला होणार वरिष्ठ स्तर दिवाणी न्यायाधीश न्यायालय, राज्य सरकारच्या 10 मोठ्या घोषणा !
आमदार रोहित पवार यांनी केलेल्या जोरदार पाठपुराव्यामुळे खर्डा पोलिस स्टेशनला सरकारकडून 26 ऑगस्ट 2021 रोजी खर्डा पोलिस स्टेशनला मंजुरी देण्याबरोबरच पोलिस स्टेशनसाठी 35 जणांच्या स्टाफला मंजुरी देण्यात आली होती. यामध्ये सहाय्यक पोलिस निरीक्षक 1, पोलिस उपनिरीक्षक 1, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक 3, हेडकाँन्स्टेबल 6, पोलिस नाईक 9 आणि पोलिस शिपाई 15 यांचा समावेश असणार आहे.
Ram Shinde | विधानपरिषदेचं तिकीटं कसं मिळालं ? जाणून घ्या राम शिंदे यांच्याच शब्दांत संपूर्ण किस्सा !
दरम्यान गेल्या अनेक दिवसांपासून खर्डा पोलिस स्टेशन कधी सुरू होणार याकडे जनतेचे लक्ष लागले होते. जंगी उद्घाटन सोहळा न होता आजपासून खर्डा पोलिस स्टेशन जनतेच्या सेवेसाठी कार्यान्वित झाले आहे. या पोलिस स्टेशनची धुरा सहाय्यक पोलिस निरीक्षक प्रकाश पाटील यांच्याकडे असणार आहे. खर्डा पोलिस स्टेशनसाठी 20 जणांचा स्टाफ आला आहे.
दरम्यान आजपासून खर्डा पोलिस स्टेशन जनतेच्या सेवेसाठी कार्यान्वित झाल्याने खर्डा परिसरातील जनतेत आनंदाचे वातावरण आहे.
खर्डा पोलिस स्टेशन हे अहमदनगर जिल्ह्यातील शेवटच्या टोकावरील पोलिस स्टेशन असणार आहे. मराठवाड्याचा प्रवेशद्वार असलेल्या भागात खर्डा शहर आहे. या भागात मराठवाड्यातील गुन्हेगारांचा नेहमी वावर असतो, या भागाला गुन्हेगारीमुक्त आणि अवैध धंदेमुक्त परिसर बनवण्यासाठी अगामी काळात खर्डा पोलिसांना मोठी योजना हाती घ्यावी लागणार आहे.