जामखेड पोलिसांची धडाकेबाज कारवाई: चोरीच्या मोटारसायकली केल्या हस्तगत;एका विरोधात गुन्हा दाखल (Jamkhed police action: Seize stolen motorcycles; file a case against one)
जामखेड टाईम्स वृत्तसेवा : जामखेड पोलिसांनी एका मोटारसायकल चोरास अटक करण्याची धडाकेबाज कारवाई केली आहे. त्याच्याकडून चार चोरीच्या जुन्या मोटारसायकली हस्तगत करण्यात आल्या आहेत. ही कारवाई पोलिस निरीक्षक संभाजीराव गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरीक्षक महेश जानकर यांच्या पथकाने पार पाडली. (Jamkhed police action: Seize stolen motorcycles; file a case against one)
जामखेड शहरातील खर्डा चौक परिसरात गस्तीवर असलेल्या जामखेड पोलिसांच्या पथकाला 04 फेब्रुवारी रोजी पहाटे एक तरूण विना नंबरच्या मोटारसायकलवरून जाताना दिसला. पोलिस पथकाने सदर मोटारसायकल थांबवत अधिक चौकशी केली असता सदर तरूणाने उडवाउडवीची उत्तरे दिली. यामुळे पोलिस पथकाचा संशय बळावला. पोलिसांनी सखोल चौकशी केली असता सदर तरूणाने मोटारसायकल चोरीची असल्याचे सांगितले. पोलिसांनी त्या तरूणाकडून गुरूवारी सायंकाळी आणखीन तीन चोरीच्या मोटारसायकली हस्तगत केल्या आहे.या प्रकरणी पोलिस काँस्टेबल शिवलिंग लोंढे यांच्या फिर्यादीवरून आरोपी तरूणाविरोधात महाराष्ट्र पोलिस अधिनियमन 1951 च्या कलम 124 प्रमाणे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. कारवाईच्या पथकात पोलिस काँस्टेबल शिवलिंग लोंढे, संग्राम जाधव, आबासाहेब अवारे, विजकुमार कोळी, अरूण पवार, संदिप राऊत, सचिन राठोड, दत्तु बेलेकर सह आदींचा समावेश होता.