सराईत दरोडेखोरांच्या टोळीला जामखेड पोलिसांनी ठोकल्या बेड्या, अवघ्या 15 दिवसांत जामखेड दरोड्याची उकल, गुन्हा शोध पथकाची धडाकेबाज कामगिरी !

जामखेड टाईम्स वृत्तसेवा  : जामखेड शहरातील शिक्षक काॅलनी दरोडा प्रकरणातील सहा दरोडेखोरांना बेड्या ठोकण्याची धडाकेबाज कारवाई जामखेड पोलिसांनी पार पाडली. दरोडेखोरांकडून चोरीस गेलेला मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. अवघ्या 15 दिवसाच्या आत जामखेड दरोड्याच्या गुन्ह्याची उकल करण्याची धडाकेबाज कारवाई जामखेड पोलिसांनी पार पाडली. या कारवाईमुळे जामखेड पोलिसांचे कौतूक होत आहे.

जामखेड शहरातील शिक्षक काॅलनी येथे 27 डिसेंबर रोजी पहाटे 3 वाजता विजय निवनाथ खुपसे या एस टी ड्रायव्हरच्या घरावर दरोडा पडला होता. या घटनेत रोख पैसे व सोन्याची दागिणे चोरीस गेले होते. शस्त्रांचा धाक दाखवून दरोडेखोरांनी शिक्षक काॅलनीत मोठा धुडगूस घातला होता. या प्रकरणी जामखेड पोलिस स्टेशनला भादवि क.395 सह आर्म ॲक्ट क.4/25 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता.

डीवायएसपी आण्णासाहेब जाधव, पोलीस निरीक्षक संभाजीराव गायकवाड, गुन्हे शोध पथकाचे प्रमुख पोलिस उपनिरीक्षक राजु थोरात यांनी तातडीने घटनास्थळी भेट दिली होती. तसेच डॉग स्कॉड,फिंगरप्रिट ,स्थानिक गुन्हे शाखा येथील अधिकारी व अंमलदार यांनी भेट दिली होती. सदरील घटना घडल्याचे अनुषंगाने वरीष्ठांनी तपासाच्या सुचना देवुन तपास पथके तयार केली होती.

सदर गुन्ह्याचा तपास पोलीस उपनिरीक्षक राजु थोरात व गुन्हे शोध पथक करीत होते. तपास सुरू असतानाच 27 रोजी रात्री 2 वाजता नितीन ऊर्फ कव्या धनसिंग पवार व त्याचा साडु तसेच इतर साथीदारांनी सदरचा दरोडा टाकल्याची खात्रीदायक बातमी पोलिस निरीक्षक संभाजीराव गायकवाड यांना गुप्तबातमीदाराने दिली. त्यानंतर जामखेड पोलिसांच्या गुन्हा शोध पथकाने नितीन ऊर्फ कव्या धनसिंग पवार व जटा सुखलाल पारधी या दोघांना 4 जानेवारी 2022 रोजी तपासकामी ताब्यात घेतले. दोघांकडे सखोल चौकशी केली असता दोघांनी गुन्ह्याची कबुली दिली.

गुन्हा शोध पथकाची धडाकेबाज कामगिरी

नितीन ऊर्फ कव्या धनसिंग पवार व जटा सुखलाल पारधी या दोघांनी दरोड्याची कबुली दिल्यानंतर त्यांच्याकडे पोलिसांनी अधिक चौकशी करून इतर आरोपींच्या सहभागाविषयी माहिती घेतली असता अक्षय ऊर्फ काळ्या लाखन पवार (रा.मिलिंदनगर, जामखेड)अनिल ऊर्फ लखन रतन ऊर्फ रवि काळे (रा.लिंपनगाव, ता.श्रीगोंदा) संतोष ऊर्फ बुट्ट्या कंठीलाल (खंडोबावस्ती, जामखेड) सुरज कान्हु पवार (मिलिंदनगर जामखेड) यांची नावे सांगत आम्ही सर्वांनी मिळून दरोडा टाकल्याचे कबूल केले.

फरार चौघे आरोपी कुठे आहेत ? याबाबत अटकेतील आरोपींकडे चौकशी केली असता चौघे आरोपी हे जामखेडच्या आसपासच्या परिसरात असल्याची माहिती दिली. सदर आरोपींचा शोध घेण्याचा प्रयत्न केला असता आरोपी जामखेड शहरात आल्याची माहिती गुन्हा शोध पथकाला मिळाली त्यानंतर दोन टीम तयार करून चौघा दरोडेखोरांना गुन्हा शोध पथकाने अटक केली. सहा दरोडेखोरांनी गुन्ह्याची कबुली दिली आहे.

शिक्षक काॅलनीत 27 रोजी एस टी ड्रायव्हर च्या घरावर पडलेल्या दरोड्यातील सहभागी सहा दरोडेखोरांना अटक करण्याची धडाकेबाज कारवाई जामखेड पोलिसांनी पार पाडली आहे. अवघ्या 15 दिवसाच्या आत दरोड्याच्या गुन्ह्याची उकल करण्याची धडाकेबाज कारवाई जामखेड पोलिसांनी पार पाडली.

दरोड्यातील मुद्देमाल हस्तगत

जामखेड पोलिसांनी अटक केलेल्या सहा दरोडेखोरांकडून सोने वेढा अंगठी 3 – वजन 3 ग्रॅम, सोने पेटी 2– वजन दीड ग्रॅम, सोने रिंगा गोल –वजन 2 ग्रॅम, सोने नथ 1 – वजन अर्धा ग्रॅम, सोने बुशी 1-वजन 4 ग्रॅम, सोने  ले.अंगठी 1- वजन 4 ग्रॅम, सोने मणीमंगळसुत्र –वजन 5 ग्रॅम असा मुद्देमाल व गुन्ह्यात वापरलेली लोखंडी तलवार, लोखंडी सुरा ,स्क्रु डायव्हर, लोखंडी कटावणी ,अँडस्टेबल लोखंडी पान्हा, लोखंडी खोलनी अशी हत्यारे पोलिसांनी हस्तगत केली आहेत.

सराईत दरोडेखोर अटकेत

जामखेड पोलिसांनी शिक्षक काॅलनी दरोडा प्रकरणात 1) नितीन ऊर्फ कव्या धनसिंग पवार रा.गोरोबा टॉकी,जामखेड हल्ली रा.पोखरी ता.आष्टी जि.बीड,2) जटा सुखलाल पारधी रा.जमनीटोला ता.सोहादपुर जि. होशिंगाबाद, मध्यप्रदेश 3) अक्षय ऊर्फ काळया लाखन पवार, मिलिंदनगर,जामखेड, 4) अनिल ऊर्फ लखन रतन ऊर्फ रवि काळे, लिंपनगाव, श्रीगोंदा 5) संतोष ऊर्फ बुट्ट्या कंठीलाल पवार, खंडोबावस्ती, जामखेड 6) सुरज कान्हु पवार , मिलिंदनगर जामखेड, ता.जामखेड या सहा दरोडेखोरांना अटक केली आहे. अटकेतील सर्व आरोपी हे सराईत दरोडेखोर आहेत. त्यांच्यावर राज्यात अनेक ठिकाणी गुन्हे दाखल आहेत. प्रत्येकावर जवळपास दहा पेक्षा अधिक गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत.

कारवाईच्या पथकात यांचा सहभाग

जामखेड पोलिसांनी केलेल्या धडाकेबाज कारवाईच्या पथकात पोलीस निरीक्षक श्री संभाजी गायकवाड, पोलीस उप निरीक्षक राजु थोरात, पोलिस नाईक अविनाश ढेरे, पोलिस काँस्टेबल संग्राम जाधव, पोलिस काँस्टेबल संदिप राऊत, पोलिस काँस्टेबल विजय कोळी ,पोलिस काँस्टेबल आबा आवारे ,पोलिस काँस्टेबल अरूण पवार, पोलिस काँस्टेबल संदिप आजबे पोलिस काँस्टेबल सचिन देवढे सह आदींचा समावेश होता. ही धडाकेबाज कारवाई पोलिस अधिक्षक मनोज पाटील,अप्पर पोलीस अधिक्षक सौरभकुमार अग्रवाल, डीवायएसपी अण्णासाहेब जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.