जामखेड टाईम्स वृत्तसेवा : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाचे सर्वच विभाग आता सक्रीय झाले आहेत. राज्यातील अनेक भागात कोरोनाचा उद्रेक होऊ लागला आहे. जामखेड तालुक्यात कोरोनाची दुसरी लाट येऊ नये याकरिता नागरिकांनी खबरदारी घेण्याचे अवाहन प्रशासनाने केले आहे. मात्र नागरिक मास्क न वापरता भटकंती करत आहेत. अश्या नागरिकांविरोधात शनिवारी जामखेड पोलिसांनी कारवाईचा बडगा उगारला आहे. तब्बल 21 जणांविरोधात कारवाई करण्यात आली आहे. (Due to this, Jamkhed police cracked down on 21 citizens)
जामखेड पोलिसांनी शनिवारी मास्क न वापरणार्यांविरोधात धडक मोहिम हाती घेण्याबरोबरच बेशिस्त वाहन धारकांविरोधातही कारवाईचा बडगा उगारला. शनिवारी दिवसभरात मास्क न घालता भटकंती करणार्या 21 जणांविरोधात कारवाई करत 2100 रूपयांचा दंड वसुल करण्यात आला. त्याचबरोबर दिवसभरात वाहतुक पोलिसांनी 23 केसेस करत तब्बल 5800 रूपयांचा दंड वसुल केला आहे. (Due to this, Jamkhed police cracked down on 21 citizens)
पोलिस निरीक्षक संभाजीराव गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पो.काॅ. आदिनाथ जाधव, शिवलिंग लोंढे, बापु गव्हाणे, होमगार्ड कोल्हे, विशाल राऊत, यादव, म्हसवडकर, किरण बांदल यांच्या टिमने ही कारवाई पार पाडली. (Due to this, Jamkhed police cracked down on 21 citizens)