जामखेड टाईम्स वृत्तसेवा: जामखेड तालुक्यात मोटारसायकल चोरीचे सत्र पुन्हा सुरू झाले आहे. मोटारसायकल चोरांनी (Motorcycle theft) आपला मोर्चा आता ग्रामीण भागाकडे वळवला आहे. अशीच एक घटना जामखेड तालुक्यातील आरणगाव (Arangaon village) येथून रविवारी समोर आली आहे. याप्रकरणी जामखेड पोलिस स्टेशनला ( Jamkhed Police station) एका अज्ञात चोरट्याविरोधात मोटरसायकल चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Motorcycle theft season has resumed in Jamkhed taluka. Motorcycle thieves have now shifted their focus to rural areas. A similar incident has come to light on Sunday from Arangaon in Jamkhed taluka. A case of motorcycle theft has been registered against an unidentified thief at Jamkhed police station in this regard.
अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल (Motorcycle theft)
याबाबत सविस्तर असे की जामखेड तालुक्यातील अरणगाव येथील अशोक बाबासाहेब नन्नवरे वर्षे 42 यांच्या घरासमोरून दिनांक 2 जानेवारी ते 3 जानेवारी या काळामध्ये कुणीतरी अज्ञात चोरट्याने नन्नवरे यांच्या मालकीची MH 16 AH 0245 ही मोटरसायकल चोरून नेली आहे. ही घटना रविवारी सकाळी उघडकीस आली. गाडीचा दिवसभर शोध घेतला असता गाडीचा शोध लागला नाही त्यानंतर नन्नवरे यांनी जामखेड पोलिस स्टेशन गाठत मोटारसायकल चोरीची फिर्याद दाखल केली. त्यानुसार रविवारी रात्री एका अज्ञात चोरट्याविरुद्ध कलम 379 नुसार गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. याप्रकरणाचा पुढील तपास हेड कॉन्स्टेबल शिवाजी भोस हे करत आहेत. (A case of motorcycle theft has been registered against an unidentified thief at Jamkhed police station on Sunday)