‘या’ कारणासाठी राष्ट्रवादीचे (NCP) शिष्टमंडळ पोलिस निरीक्षकांच्या भेटीला !

जामखेड टाईम्स वृत्तसेवा

राष्ट्रवादीचे (NCP) शिष्टमंडळ पोलिस निरीक्षकांच्या भेटीला !

जामखेडला नव्याने हजर झालेले पोलीस निरीक्षक संभाजीराव गायकवाड यांनी जामखेड तालुक्यात कारवाईचा मोठा बडगा उगारला आहे. या कारवाईचा धसका आता अनेकांनी घेतला आहे. जामखेड शहर व तालुक्यातील कायदा व सुव्यवस्थेला अव्हान देऊ पाहणार्या प्रवृत्तींचा बिमोड करण्यासाठी पोलिस निरीक्षक संभाजीराव गायकवाड यांच्या टिम हाती घेतलेल्या कारवाईचे जामखेड तालुका राष्ट्रवादीने (NCP) स्वागत केले आहे. सोमवारी राषट्रवादीच्या शिष्टमंडळाने नव्या पोलिस निरीक्षकांची भेट घेऊन सध्या सुरू असलेल्या कारवाई बाबत समाधान व्यक्त केले.

शहरासह तालुक्यात कायदा व सुव्यवस्था अबाधित राहण्यास प्रतिबंध ठरणाऱ्या अवैध व्यक्ती, धंदे यांच्याबाबत कठोर भूमिका घेतल्याने राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी पोलीस निरीक्षक संभाजीराव गायकवाड यांचे स्वागत करुन सत्कार करण्यात आला.

NCP

यावेळी शहरातील अवैध धंदे, अवैध दारू, खाजगी सावकारी, शाळा, कॉलेजमधील विद्यार्थीनीची छेडछाड, दहशत आणि गुंडागर्दी यांना आळा घालण्याची मागणी करण्यात आली. लोकप्रिय आ.रोहित दादा पवार (Rohit Pawar, NCP) यांच्या संकल्पनेतील “निर्भय जामखेड” करण्यासाठी आम्ही सदैव सहकार्य करु.आमचे पदाधिकारी कोणत्याही अवैध कामांसाठी आपणाला फोन करणार नसल्याचे सांगितले. एकंदरीतच,जामखेड मधील गुन्हेगारीचे समूळ उच्छाटन करण्याची आग्रही मागणी यावेळी करण्यात आली.तशा आशयाचे निवेदनही यावेळी पोलीस निरीक्षकांना देण्यात आले.

या शिष्टमंडळाचे नेतृत्व प्रदेश सरचिटणीस राजेंद्र कोठारी, तालुकाध्यक्ष दत्तात्रय वारे,कर्जत जामखेड विधानसभा अध्यक्ष मा.प्रा.मधुकर राळेभात यांनी केले.यावेळी शहराध्यक्ष राजेंद्र गोरे,कोअर कमिटीचे सदस्य उमरभाई कुरेशी, नगरसेवक अमित जाधव,दिगांबर चव्हाण, पक्षाचे नेते समीर पठाण,ज्येष्ठ नेते वैजीनाथ पोले,दादा रिटे,डॉ. चंद्रशेखर नरसाळे, महेंद्र राळेभात, ईस्माईल सय्यद, आहीरे सर आदींसह कार्यकर्ते उपस्थित होते.