महिलादिनी जामखेड पोलिसांनी उध्वस्त केले सहा हातभट्टी दारूचे कारखाने (On Women’s Day, Jamkhed police destroyed six liquor dens)

जामखेड टाईम्स वृत्तसेवा: महिलादिनी जामखेड पोलिसांनी सहा गावठी दारूभट्ट्या ऊध्वस्त करण्याची धडाकेबाज कारवाई पार पाडली. या कारवाईत सुमारे 39 हजाराचे दारू बनवण्याचे रसायन व 7 हजाराची तयार दारू नष्ट करण्यात आले. ही कारवाई कुंभारतळ व बसस्थानक परिसरात राबवण्यात आली होती. (On Women’s Day, Jamkhed police destroyed six liquor dens)

जामखेड पोलिसांनी गावठी दारू बनवण्याचे कारखाने उध्वस्त करण्याची कारवाई केल्यानंतर अश्विनी अनिल पवार, बेबी रविंद्र पवार, सिताराम मोहन पवार,  रावसाहेब हिरामण पवार, विजय आत्माराम शिंदे, सूमन कल्याण ऊर्फ बबन काळे अश्या सहा जणांविरोधात वेगवेगळ्या फिर्यादीवरून गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. (On Women’s Day, Jamkhed police destroyed six liquor dens)

ही कारवाई पोलिस निरीक्षक संभाजीराव गायकवाड यांच्या टिमने पार पाडली. या कारवाईच्या पथकात पोलिस उपनिरीक्षक राजेंद्र थोरात, पोलिस नाईक ज्ञानदेव भागवत, पोलिस काँस्टेबल अविनाश ढेरे, विजयकुमार कोळी, संग्राम जाधव, संदिप राऊत, आबासाहेब आवारे, अरूण पवार , महिला पोलिस काँस्टेबल मनिषा दहिरे, सह आदी कर्मचार्यांचा यात समावेश होता. (On Women’s Day, Jamkhed police destroyed six liquor dens)