जामखेड टाईम्स वृत्तसेवा : जामखेड तालुक्यात ग्रामपंचायत निवडणुकीचे वातावरण भलतेच तापले आहे. गावोगावी प्रचाराच्या तोफा धडाडत आहेत, पदयात्रा, जाहिर सभांनी राजकीय फड चुरशीचा झाला आहे. त्यातच झिंगलेल्या कार्यकर्त्यांची संख्याही वाढू लागली आहे. मतदारांना आकर्षित करण्यासाठी दारू वाटपाचे प्रकार वाढले आहेत. निवडणुकीमुळे जामखेड तालुक्यात दारूचा अक्षरशा: महापुर आला आहे. विशेषता: बनावट दारूचा अशी माहिती समोर येऊ लागली आहे. पांगरमल घटनेची जामखेड तालुक्यात पुनरावृत्ती टाळण्यासाठी पोलिस ( Police) प्रशासनाने आता अॅक्शनमोडवर येण्याची तयारी सुरू केली आहे.
सोमवारी रात्री सहाय्यक पोलिस निरीक्षक महेश जानकर यांच्या नेतृत्वाखालील पथकाने तालुक्यातील नायगावमध्ये धाड टाकत सुमारे 21 हजार रूपयांची देशी विदेशी दारूचा साठा जप्त केला आहे.(Police raid in Naigaon) ही कारवाई सोमवारी रात्री करण्यात आली.या कारवाईत जामखेड पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतले आहे.कारवाईच्या पथकात पोलिस नाईक शेंडे, पोलिस काँस्टेबल मनोज साखरे, शशी मस्के, सचिन पिरगळ यांचा समावेश होता.