धक्कादायक:भरदिवसा चोरट्यांनी मारला लाखोंच्या ऐवजावर डल्ला;खर्डा भागात चोरट्यांचा सुळसुळाट ! (The proliferation of thieves in the Kharda area; An atmosphere of fear among the masses)

जामखेड टाईम्स वृत्तसेवा : सध्या सुगीचे दिवस असल्याने नागरिक शेतीच्या कामात गुंतले आहेत. याच संधीचा फायदा घेऊन ग्रामीण भागात भरदिवसा घरफोडीच्या घटना आता वाढू लागल्या आहेत. खर्डा भागातील चोरट्यांचा सुळसुळाट आता पोलिसांची डोकेदुखी बनला आहे. एकाच महिन्यात जामखेड तालुक्यातील खर्डा, मोहरीत दोनदा तर लोणीतही सोमवारी भरदिवसा मोठ्या चोऱ्या झाल्या आहेत. या घटनांमुळे खर्डा भागात घबराट पसरली आहे. (The proliferation of thieves in the Kharda area; An atmosphere of fear among the masses)

जामखेड तालुक्यातील पैठण पंढरपूर राज्य मार्गावर असलेल्या मोहरी गावाच्या रस्त्यालगतच राहणाऱ्या चंद्रभान माणिक वाघमारे यांच्या घराचे कुलूप तोडून चोरट्यांनी रोख 60 हजार रूपये व घरातील सोन्या चांदीसह मौलवान वस्तूंचा एक लाख रूपयांचा ऐवज असा 01 लाख 56 हजार रुपयांचा मुद्देमाल चोरट्यांनी चोरून नेला आहे. ही घटना सोमवारी भरदिवसा घडली आहे. सुगीचे दिवस असल्यामुळे शेतकरी सध्या शेतीत कामात व्यस्त असतानाच चोरट्यांनी हा डाव साधला. याबाबत वाघमारे यांनी जामखेड पोलीस स्टेशनला सोमवारी रात्री उशिरा अज्ञात चोरट्यांविरोधात फिर्याद दाखल केली आहे. पंधरा दिवसांपुर्वी मोहरी गावात भरदिवसा मोठी घरफोडी झाली होती. दोन्ही घटनांमध्ये लाखोंचा ऐवज चोरीस गेला आहे. मोहरीत भरदिवसा सतत होणार्या चोरीच्या घटनांमुळे जनतेत भीतीचे वातावरण पसरले आहे. (The proliferation of thieves in the Kharda area; An atmosphere of fear among the masses)

The proliferation of thieves in the Kharda area; An atmosphere of fear among the masses

जामखेड तालुक्यातील लोणी येथील बबन विश्वनाथ परकड व अरुण परमेश्वर परकड यांचे बंद घराचे कुलपे तोडून चोरट्यांनी चोरी केली. बबन विश्वनाथ परकड यांच्या घरातील रोख 52 हजाराचा ऐवज चोरीस गेला. तर अरुण परमेश्वर परकड यांच्या घरात उचकापाचक करून चोरीचा प्रयत्न झाला. याबाबत रात्री उशिरापर्यंत कुठलीही तक्रार दाखल नाही.दरम्यान सदर घटनांची माहिती समजतात जामखेडचे पोलिस निरीक्षक संभाजी गायकवाड, पोलिस नाईक संभाजी शेंडे ,पोलीस कॉन्स्टेबल शशिकांत मस्के यांनी ताबडतोब घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली व तपास वेगाने सुरू केला आहे. सदर घटनेचा पुढील अधिक तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक सुनिल बडे हे करत आहेत. चोरांचा तातडीने बंदोबस्त करावा अशी मागणी शेतकरी वर्गातून केली जात आहे. (The proliferation of thieves in the Kharda area; An atmosphere of fear among the masses)