सावरकर मल्टीस्टेटने घातला 2 लाखांचा गंडा: पाच जणांविरोधात गुन्हे दाखल (Savarkar Multistate commits fraud of Rs 2 lakh: Five persons booked)

जामखेड टाईम्स वृत्तसेवा : मुदत ठेवीवर अकर्षक व्याजदर व परतावा देण्याचे अमिष दाखवून  बँकेत मुदत ठेव म्हणून ठेवलेली 02 लाख रुपयांची रक्कम परत न देता फसवणूक केल्याप्रकरणी सावरकर मल्टीस्टेट को, सोसायटीच्या जामखेड शाखेच्या मॅनेजिंग डायरेक्टरसह 05 जणांविरोधात फसवणूकीचे गुन्हे जामखेड पोलिस स्टेशनला दाखल करण्यात आले आहेत. सदर मल्टीस्टेट पतसंस्थेने आणखीन किती जणांना लाखोंचे गंडे घातले आहेत? हे शोधणे आता महत्त्वाचे ठरणार आहे. (Savarkar Multistate commits fraud of Rs 2 lakh: Five persons booked)

याबाबत जामखेड पोलिस स्टेशनला उमेश विठ्ठल देशमुख रा. जामखेड यांनी फिर्याद दाखल केली आहे. फिर्यादीत म्हटले आहे की, 02 वर्षापूर्वी जामखेड शहरात वि. दा. सावरकर मल्टीस्टेट को – अॉफ सोसायटीची शाखा सुरू झाल्यानंतर मुदत ठेवीवर आकर्षक व्याजदरासह परतावा देण्याच्या आलेल्या जाहीराती नुसार या शाखेत 13 महीन्यांच्या मुदतीवर 02 लाख रुपयांची ठेव ठेवली होती. मुदत संपल्यानंतर देशमुख हे आपले पैसै आणण्यासाठी शाखेत गेले आसता बँक दिवाळखोरीत निघाल्याचे शाखेतील कर्मचार्‍यांकडुन देशमुख यांना सांगण्यात आले. यानंतर वेळोवेळी पैशाची मागणी करुनही संबंधित बँकेचे अधिकारी व कर्मचाऱ्यांकडुन पैसै मिळत नसल्याने आपली फसवणूक झाल्याचे देशमुख यांच्या लक्षात आले त्यानुसार देशमुख यांनी जामखेड पोलिस स्टेशनला फिर्याद दाखल केली आहे.(Savarkar Multistate commits fraud of Rs 2 lakh: Five persons booked)

वि.दा. सावरकर मल्टीस्टेटच्या जामखेड शाखेचे शाखाव्यवस्थापक वैभव देशमुख, रोखपाल विकास नानासाहेब कुलकर्णी, लिपिक शेखर प्रमोद वायभट तिघेही रा. जामखेड व मॅनेजिंग डायरेक्टर प्रमोद बालाजी निमसे व गणेश शंकर थोरात दोघेही रा. केडगाव, अहमदनगर अशा 05 जणांविरोधात जामखेड पोलीस स्टेशनला फसवणूकीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास जामखेड पोलिस करत आहेत.