खळबळजनक : जामखेड पोलिसांच्या पथकावर जमावाकडून हल्ला, पोलिसांना मारहाण, खासगी वाहनाची तोडफोड , 9 जणांविरोधात गुन्हे दाखल
जामखेड टाइम्स वृत्तसेवा : फसवणुकीच्या गुन्ह्यातील फरार आरोपीला पकडण्यासाठी बीड (beed news) जिल्ह्यातील केजमध्ये (kej) गेलेल्या जामखेड (Jamkhed) पोलिसांच्या पथकावर जमावाकडून हल्ला करण्यात आल्याची धक्कादायक उघडकीस आली आहे. या घटनेत जामखेड पोलिसांच्या खाजगी वाहनाचे मोठे नुकसान झाले. त्याचबरोबर पोलिसांनाही मारहाण करण्यात आली आहे. ही घटना केज शहरातील (kaij news today) छत्रपती शिवाजी महाराज चौकात १६ फेब्रुवारी रोजी मध्यरात्री २.३० वाजता घडली. या प्रकरणी केज पोलीस स्टेशनला (kaij Police Station) जणांविरोधात 9 गुन्हे दाखल केले आहेत.
जामखेड पोलीस स्टेशनला दाखल असलेल्या गुन्हा रजिस्टर क्रमांक 15/2024 भादवि कलम 420, 506, 504, 34 या गुन्ह्यातील फरार आरोपी प्रतीक भैरवनाथ चाळक Prateek Bhairavanath Chalak (लहूरी ता केज जि बीड) याच्या शोधासाठी जामखेड पोलिसांचे चार जणांचे पथक खासगी जीपने (एमएच १६ सीव्ही ५५५५) बीड जिल्ह्यातील केज भागात गेले होते. सदर आरोपीला पकडून घेऊन निघालेल्या जामखेड पोलिसांच्या खासगी वाहनावर आरोपीच्या साथीदारांनी हल्ला केला.या घटनेत तीन पोलिसांना मारहाण करण्यात आली. तसेच पोलिसांच्या खाजगी वाहनाच्या काचा फोडण्यात आल्या.
जामखेड पोलिसांच्या रेकॉर्डवरील फसवणुकीच्या गुन्ह्यात फरार आरोपी प्रतीक भैरवनाथ चाळक (रा. लव्हुरी, ता. केज) याच्या शोधासाठी जामखेड पोलिसांचे चार जणांचे पथक खासगी जीपने (एमएच १६ सीव्ही ५५५५) केज मध्ये गेले होते. मध्यरात्री १ वाजता केज पोलिस ठाण्यातून पथकाने मदत मागितली. त्यानंतर केजचे सहायक फौजदार आर. बी. वाघमारे हे पथकासोबत मदतीसाठी गेले.
आरोपीच्या शोधासाठी पोलिसांचे पथक केज तालुक्यातील लव्हुरी गावातील बसस्थानकाजवळ पोहोचले असता त्या ठिकाणी २० ते २५ जणांचे टोळके दुसऱ्या जीपच्या (एमएच ४४ झेड २३००) बोनेटवर केक ठेवून वाढदिवस साजरा करत होते. त्याच जमावामध्ये आरोपी प्रतीक चाळक हा पोलिसांना दिसला. पोलिसांनी त्याच क्षणी त्याला ताब्यात घेतले.
आरोपी प्रतीक भैरवनाथ चाळक याला कानडीमार्गे केज पोलिस ठाण्याकडे घेऊन जात असलेल्या पोलिस पथकाच्या खाजगी वाहनाचा आरोपीच्या साथीदारांनी पोलिसांच्या वाहनाचा पाठलाग करत त्यांची जीप पोलिसांच्या वाहनाला आडवी लावली. पोलिसांनी आपली गाडी थांबवल्यानंतर आरोपीच्या साथीदारांनी पोलीस पथकावर हल्ला चढवला.या हल्ल्यात तीन पोलिसांना मारहाण करण्यात आली. त्याच बरोबर पोलीस वाहनाच्या काचा फोडण्यात आल्या.
मध्यरात्री आरोपीच्या साथीदारांनी पोलीस पथकावर हल्ला करून आरोपीला पळवण्याचा प्रयत्न केलां. त्यांचा हा प्रयत्न पोलिसांच्या गाडीचे चालक यांनी दाखवलेल्या समय सुचकतेमुळे फसला. पोलिसांच्या गाडीचे चालक यांनी गाडी मागे घेत केजच्या दिशेने भरधाव वेगाने नेली. त्यामुळे या प्राणघातक हल्ल्यातून पोलीस पथक थोडक्यात बचावले.
आरोपी प्रतीक भैरवनाथ चाळक (लहूरी ता केज जि बीड) याच्या साथीदारांनी केलेल्या हल्ल्यात जमादार प्रवीण इंगळे, पोलिस नाईक ज्ञानेश्वर बेल्हेकर व शिपाई कुलदीप घोळवे यांना मारहाण केली. आरोपी प्रतीक चाळक याला जीपबाहेर ओढण्याचा प्रयत्न जमावाने केला. त्यानंतर चालकाने प्रसंगावधान राखत जीप मागे घेत तत्काळ पोलिस ठाण्यात आणली.
जामखेड पोलिसांच्या पथकावर हल्ला केल्या प्रकरणी केज पोलीस स्टेशनला पोलिस नाईक ज्ञानेश्वर विठ्ठल बेल्हेकर यांनी केज पोलिस स्टेशनला फिर्याद दाखल केली आहे. त्यानुसार अभिषेक सावंत, ईश्वर चाळक, राहुल चाळक, सौरभ चाळक, रोहित चाळक, मुन्ना बचाटे (Abhishek Sawant, Ishwar Chalak, Rahul Chalak, Saurabh Chalak, Rohit Chalak, Munna Bachate सर्व राहणार लहूरी ता केज जि बीड) व तीन अनोळखी अशा ९ जणांविरोधात कलम 353, 225, 341, 332, 143, 147, 148, 149, 323, 427 नुसार गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
दरम्यान जामखेड पोलीस स्टेशनला दाखल असलेल्या कलम 420, 506, 504, 34 प्रमाणे दाखल असलेल्या गुन्ह्यातील आरोपी प्रतीक भैरवनाथ चाळक याने अनेकांना लाखोंचा गंडा घातलेला आहे. प्रतिक चाळकच्या मुसक्याआवळल्यानंतर त्याला जामखेड पोलिसांनी आज जामखेड न्यायालय येथे हजर केले.त्यास न्यायालयाने पाच दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे. पुढील तपास पोलीस हवादार प्रवीण इंगळे हे करीत आहे.
Edited By : Sattar Shaikh