धक्कादायक : जामखेडमध्ये रत्नदीप मेडिकल कॉलेजच्या विद्यार्थिनीची गळफास घेऊन आत्महत्या, जामखेडमध्ये उडाली मोठी खळबळ
जामखेड टाइम्स वृत्तसेवा : जामखेड तालुक्यातील रत्नापुर येथील रत्नदीप मेडिकल कॉलेजमध्ये BHMS चे शिक्षण घेत असलेल्या एका विद्यार्थिनीने आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना आज सायंकाळी उघडकीस आली आहे. घटनेची माहिती मिळताच जामखेड पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेत पुढील तपास सुरू केला आहे.
जामखेड तालुक्यातील रत्नापुर येथे रत्नदीप मेडिकल कॉलेज आहे. या काॅलेजला राज्यभरातील शेकडो विद्यार्थी आणि विद्यार्थिनी शिक्षण घेत आहेत. काही विद्यार्थी आणि विद्यार्थीनी शासकीय होस्टेलला तर काही खाजगी रूम करून जामखेड शहरात वास्तव्यास आहेत. जामखेड शहरातील तपनेश्वर भागात डिंपल पाटील ही विद्यार्थीनी वास्तव्यास होती. मुळची नागपुर येथील रहिवासी असलेली डिंपल पाटील रत्नदीप मेडिकल कॉलेजला बी. एच. एम. एस. च्या तिसऱ्या वर्षात शिकत होती. या विद्यार्थीनीने गळफास घेत आत्महत्या केल्याची घटना आज सायंकाळी उघडकीस आली.
मयत विद्यार्थीनी तपनेश्वर भागातील मुकुंद जवकर यांच्या इमारतीतील तिसऱ्या मजल्यावर भाडे तत्त्वावर राहत होती. डिंंलला तिच्या आईने फोन केला असता तिने फोन घेतला नाही, म्हणून तिच्या आईने डिंपलच्या मैत्रीणीला फोन केला, तेव्हा तिच्या मैत्रीणीेंंनी डिंपलच्या रूमवर जाऊन पाहिले असता डिंपलने आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली.
त्यानंतर तिच्या मैत्रिणींनी इतर स्थानिकांच्या मदतीने सदर घटनेची माहिती जामखेड पोलिस स्टेशनला कळवली, त्यानंतर जामखेड पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर पोलिसांनी लटकलेल्या अवस्थेतील डिंपल पाटील हिचा मृतदेह खाली उतरवत ताब्यात घेतला, त्यानंतर सदर मृतदेह जामखेड ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आला आहे.
मयत तरूणी ही नागपुर येथील रहिवासी आहे, पोलिसांनी सदर घटनेची माहिती तिच्या कुटुंबियांना कळवली आहे. तिचे कुटुंबिय जामखेडला येण्यासाठी रवाना झाले आहेत. सदर तरुणीने आत्महत्या का केली असेल? या कारणाचा जामखेड पोलिस वेगाने शोध घेत आहेत. दरम्यान, मयत डिंपल हिने आत्महत्येपुर्वी चिठ्ठी वैगरे लिहिली आहे का ? याचा उलगडा तिचे कुटुंबिय आल्यानंतरच होईल. डिंपल पाटील या विद्यार्थीनीच्या आत्महत्येमुळे रत्नदीप मेडिकल कॉलेजला शिक्षण घेत असलेल्या सर्वच विद्यार्थ्यांमध्ये तसेच जामखेड तालुक्यात मोठी खळबळ उडाली आहे.
दरम्यान, घटनास्थळी पोलीस निरीक्षक संभाजीराव गायकवाड, सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनिल बडे हेेड काँस्टेबल संजय लोखंडे, पोलिस काँस्टेबल सचिन पिरगळ, अरूण पवार, सतीश दळवी, आजीनाथ जाधव, दिनेश गंगे सह आदींनी भेट देऊन पाहणी केली. मृतदेह ताब्यात घेऊन जामखेड पोलिसांनी पुढील तपास हाती घेतला आहे.