जामखेड तालुक्यात सध्या 49 ग्रामपंचायतींच्या निवडणुकांचा कार्यक्रम सुरू आहे. (49 Gram Panchayat Election) जामखेड तालुक्यातील जी गावे राजकीयदृष्ट्या संवेदनशील म्हणून ओळखले जातात तसेच ज्या गावांमध्ये राजकीय वादावादीचे प्रकार सातत्याने घडतात अशा गावांवर आता जामखेड पोलीसांनी (Jamkhed Police) लक्ष केंद्रीत केले आहे. ग्रामपंचायत निवडणुकीच्या काळामध्ये तालुक्यातील कुठल्याही गावांमध्ये राजकीय वादावादीचे प्रकार होऊ नये यासाठी सध्या पोलीस निरीक्षक संभाजीराव गायकवाड (PI Sambhajirao Gaikwad) यांनी शांतता कमिटीच्या बैठकांचा धडाका लावला आहे. निवडणुकीच्या काळामध्ये गडबड गोंधळ करणाऱ्या गावगुंडांना धडा शिकवण्यासाठी पोलिसांनी आता कंबर कसली आहे. ग्रामपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जामखेड पोलिस स्टेशनच्या वतीने राबवण्यात येत असलेल्या उपाययोजनांच्या संदर्भामध्ये पोलीस निरीक्षक संभाजीराव गायकवाड यांनी जामखेड टाईम्सला (Jamkhed Times) सविस्तर मुलाखत (Interview) देत आपली भूमिका स्पष्ट केली आहे.