भल्या पहाटे फरार आरोपी अडकले पोलिसांच्या जाळ्यात : जामखेड पोलिसांची धडाकेबाज कारवाई (The absconding accused was caught by the police)
जामखेड टाईम्स वृत्तसेवा : विविध गंभीर गुन्ह्यातील फरार आरोपींच्या मुसक्या आवळण्याच्या जामखेड पोलिस स्टेशनच्या मोहिमेला आता यश येत असल्याचे दिसत आहे. मंगळवारी पहाटे जामखेड पोलिसांच्या गुन्हे शोध पथकाने सोनेगावमध्ये केलेल्या धडक कारवाईत तीन फरार आरोपींच्या मुसक्या आवळण्यात आल्या. (The absconding accused was caught by the police)
जामखेड पोलिस स्टेशनला सन 2017 साली गुन्हा रजि.नं. 75/2017 भा.द.वि कलम 395 ,323, 504,506 आर्म ॲक्ट 3/25 हा गुन्हा दाखल झाला होता. या गुन्ह्यातील आरोपी प्रदिप राजु कांबळे, बाळु सिताराम मिसाळ , विशाल जगन्नाथ जाधव सर्व रा.सोनेगाव ता.जामखेड हे गेल्या चार वर्षांपासून फरार होते. (The absconding accused was caught by the police)
सदर आरोपी सोनेगाव या गावी आल्याची बातमी गुप्तबातमीदारामार्फत पोलिस निरीक्षक संभाजीराव गायकवाड यांना मिळाली होती. पोलिस निरीक्षक गायकवाड यांनी तातडीने सहाय्यक पोलिस निरीक्षक सुनिल बडे तसेच गुन्हे शोध पथकातील पोलीस उपनिरिक्षक राजेंद्र थोरात, पोलीस काँन्टेबल अविनाश ढेरे, संग्राम जाधव, आबासाहेब आवारे, अरूण पवार, विजयकुमार कोळी, संदिप राऊत, गणेश गाडे यांना सदर बातमी सांगुन फरारी आरोपी पकडण्यासाठी रवाना केले. जामखेड पोलीसांच्या पथकाने मंगळवारी पहाटे सोनेगावमध्ये सापळा लावत केलेल्या धडक कारवाईत 3 फरार आरोपी पकडण्यात यश मिळवले. (The absconding accused was caught by the police)