Shocking: चोरट्यांनी मारला तब्बल साडे सहा लाख रूपयांच्या मुद्देमालावर डल्ला ! Theft of Rs 6.5 lakh in Patoda robbery
जामखेड टाईम्स वृत्तसेवा: जामखेड तालुक्यात गेल्या काही दिवसांपासून घरफोडीचे सत्र सुरूच आहे. चोरट्यांकडून कधी दिवसा तर कधी रात्री लुटमार केली जात आहे. यामुळे जनतेत भीतीचे वातावरण पसरले आहे. अश्यातच आणखीन एक घरफोडीची घटना समोर आली आहे. जामखेड तालुक्यातील पाटोदा येथील मोरेवस्तीवर तीन चोरट्यांनी घरफोडी करत तब्बल साडे सहा लाख रूपयांच्या मुद्देमालावर डल्ला मारला आहे. (Theft of Rs 6.5 lakh in Patoda robbery)
मंगळवारी पहाटे ही घटना घडली आहे. या घटनेत चोरट्यांच्या मारहाणीत फिर्यादी हे जखमी झाले आहेत. या घटनेत चोरट्यांनी रोख दोन लाख रूपये व साडे पाच लाख रूपयांचे दागिणे चोरून पोबारा केला आहे. या घटनेमुळे पाटोदा परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. (Theft of Rs 6.5 lakh in Patoda robbery)