BREAKING : 14 वर्षीय अल्पवयीन विद्यार्थिनीवर शिक्षकाकडून लैंगिक अत्याचार, लिंगपिसाट शिक्षकाला पोलिसांनी ठोकल्या बेड्या, शिक्षण क्षेत्राला काळीमा फासणार्या घटनेने जामखेड तालुक्यात उडाली मोठी खळबळ !
जामखेड टाइम्स वृत्तसेवा : शिक्षण क्षेत्राला काळिमा फासणारी एक धक्कादायक घटना आज उघडकीस आली आहे. या घटनेत नराधम शिक्षक गेल्या सहा महिन्यांपासून एका 14 वर्षीय अल्पवयीन विद्यार्थीनीला ब्लॅकमेल करत अत्याचार करत असल्याची बाब उघडकीस आली आहे. लैंगिक अत्याचार करणाऱ्या नराधम शिक्षकाविरोधात जामखेड पोलिसांत विविध कलमानुसार गंभीर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.नराधम शिक्षकाचे दुष्कृत्य उजेडात येताच जामखेड तालुक्यात मोठी खळबळ उडाली आहे.
जामखेड तालुक्यातील साकत येथील लिंगपिसाट नराधम शिक्षक राधाकिसन उर्फ राधे जगन्नाथ मुरूमकर वय ३० वर्षे याने शाळेतील अल्पवयीन विद्यार्थीनीशी शाळेच्या अभ्यासाच्या माध्यमांतून स्नॅपचॅट या सोशल मिडीया साईटच्या माध्यमांतून जवळीक साधली होती.या माध्यमांतून त्याने तिच्याकडून अर्धनग्न फोटो मागवले होते.याच अर्धनग्न फोटो वापर करून नराधम शिक्षक विद्यार्थीनीला ब्लॅकमेल करत होता, सदर अर्धनग्न फोटो सोशल मिडीयावर वायरल करण्याची धमकी तो पिडीत विद्यार्थीनीला वारंवार देत होता.
सदर नराधम शिक्षकाने अर्धनग्न फोटोंचा आधार घेत त्याने पिडीत अल्पवयीन मुलीस 14 जून 2023 रोजी आष्टी येथील हर्षद लाॅजवर नेले. त्या ठिकाणी लिंगपिसाट शिक्षकाने अल्पवयीन मुलीसोबत बळजबरीने शारीरिक संबंध केले. कुणाला काही सांगितल्यास अर्धनग्न फोटो सोशल मिडीयावर व्हायरल करण्याची त्याने पिडीतेला धमकी दिली होती. सदर नराधम शिक्षक हा पिडीतेला जानेवारी महिन्यापासून ते 14 जून 2026 असे सहा महिन्यांपासून तीचे अर्धनग्न फोटो सोशल मिडीयावर व्हायरल करण्याची धमकी देत अत्याचार करत होता.
सदर घटनेची बाब उघडकीस होताच लिंगपिसाट शिक्षक राधाकिसन उर्फ राधे जगन्नाथ मुरूमकर वय ३० वर्षे रा. साकत ता. जामखेड याच्याविरोधात जामखेड पोलीस स्टेशनला कलम ३७६ (२) एफ (आय) भादवी सह कलम ४ बालकाच्या लैंगिक अपराधापासून संरक्षण अधिनियमाप्रमाणे गुन्हा दाखल केला आहेत.
यावेळी जामखेड पोलिसांनी सदर नराधम शिक्षकाच्या तातडीने मुसक्या आवळत त्याला गजाआड केले आहे. कारवाईच्या पथकात पोलीस निरीक्षक महेश पाटील, एपीआय सुनील बडे पोलीस हेडकाँन्टेबल संजय लाटे, पोलीस नाईक अविनाश ढेरे, पोलीस काँन्टेबल देवा पळसे, सचिन पिरगळ, प्रकाश जाधव, प्रविण पालवे यांचा समावेश होता.
जामखेड पोलिसांनी आरोपी शिक्षक राधाकिसन उर्फ राधे जगन्नाथ मुरूमकर याला आज श्रीगोंदा जिल्हा न्यायालयात हजर केले असता त्याला न्यायालयाने 26 जून पर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.