जामखेड टाईम्स वृत्तसेवा | Jamkhed Crime News | जामखेड तालुक्यातील साकतमध्ये भावकीचा वाद उफाळून आल्याची घटना समोर आली आहे. या घटनेत दोन जण गंभीर जखमी झाला आहे. या प्रकरणात 07 जणांविरोधात खुनाचा प्रयत्न करणे यासह विविध कलमान्वये गुन्हे दाखल झाल्याने खळबळ उडाली आहे. (Attempted murder case against 7 persons in Sakat)
याबाबत पोलिस सुत्रांकडून मिळालेली माहिती अशी कि, जामखेड तालुक्यातील साकत येथे 24 डिसेंबर रोजी रात्री साडेदहाच्या सुमारास भावकीचा वाद उफाळून आला. एका गटाने फिर्यादी व त्याच्या साथीदार मित्रास बेदम मारहाण करण्याची घटना घडली. या घटनेत फिर्यादीसह त्याचा साथीदार मित्र हा जखमी झाला आहे.
फिर्यादी व आरोपी यांच्यात गेल्या काही काळापासून वाद आहेत. अश्याच एका वादात फिर्यादीच्या मित्राने फिर्यादीस मदत केली होती. हाच राग मनात धरून शुक्रवारी रात्री फिर्यादीच्या भावकीतील लोकांनी फिर्यादी आणि त्याच्या मित्रावर जोरदार हल्ला चढवला.या हल्ल्यात फिर्यादी व त्याचा मित्र गंभीर जखमी झाला. मारहाणीची घटना साकत ग्रामपंचायत कार्यालयात परिसरात घडली आहे.
या घटनेत आरोपींनी तलवार, कुऱ्हाड, कोयता व काठीने फिर्यादी व त्याच्या मित्राला मारहाण करून जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला.पुन्हा जर आमच्या नादी लागले तर असे होते अशी धमकी दिली असे फिर्यादीत म्हटले आहे. याप्रकरणी पांडुरंग नागनाथ आडसूळ (वय 33) या जेसीबी ऑपरेटरने 25 रोजी जामखेड पोलिस स्टेशनला फिर्याद दाखल केली आहे.
पांडुरंग आडसुळ यांच्या फिर्यादीवरून साकत येथील जगन्नाथ उर्फ दादा पोपट आडसूळ, ज्ञानेश्वर पोपट अडसूळ, भाऊसाहेब चतुर्भुज मुरूमकर, गणेश उर्फ पप्पू आश्रु अडसूळ, बाळासाहेब ऊर्फ बाळू हनुमंत आडसूळ, हनुमंत विष्णू अडसूळ, पोपट बापूराव आडसुळ या सात जणांविरोधात गु रजि नं.व कलम:- 541/2021 भा.द.वि.क. 307, 143, 147, 148, 149, 323, 504, 506 प्रमाणे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
साकत गावात झालेल्या मारहाणीच्या घटनेत महेश भागवत लहाने व फिर्यादी पांडुरंग आडसुळ हे दोघे जखमी झाले आहेत. सदर घटनेचा पुढील तपास पोलिस निरीक्षक संभाजीराव गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील बडे हे करत आहेत. jamkhed crime news, Attempted murder case against 7 persons in Sakat, Two persons were injured in a beating incident at Sakat in Jamkhed taluka