Crime News Today | खर्ड्यात चोरट्यांचा धुमाकुळ, चोरट्यांच्या हल्ल्यात वृध्दासह चिमुकला जखमी, खर्डा परिसरात उडाली मोठी खळबळ
जामखेड टाईम्स वृत्तसेवा । Crime News Today | शनिवारी भल्या पहाटे चोरट्यांनी खर्डा (kharda) परिसरात धुमाकुळ घातल्याची घटना उघडकीस आली आहे. या घटनेत चोरट्यांनी केलेल्या मारहाणीत दोघे जखमी झाले आहेत. भल्या पहाटे घडलेल्या या घटनेमुळे खर्डा परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.(Incident of burglary at Kharda, Thieves attack, two injured, Great excitement in the Kharda area)
जामखेड तालुक्यातील खर्डा शहरातील गोलेकर लवण भागात राहणारे विकास ऊर्फ बाळासाहेब दत्तात्रय गोलेकर (Vikas Golekar) यांच्या घरी ही चोरीची घटना घडली आहे. या घटनेत तब्बल 66 हजारांचा ऐवज लंपास करत दरोडेखोर पसार झाले. या प्रकरणी जामखेड पोलिस स्टेशनला (Jamkhed Police Station) शनिवारी अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
याबाबत मिळालेली माहिती अशी की, जामखेड तालुक्यातील खर्डा येथील गोलेकर लवण या भागात राहणारे विकास ऊर्फ बाळासाहेब दत्तात्रय गोलेकर यांच्या घरी आज शनिवारी पहाटे तीनच्या सुमारास चोरीची घटना घडली आहे. या घटनेत चोरट्यांनी फिर्यादी विकास गोलेकर यांचे वयोवृद्ध वडील दत्तात्रय नामदेव गोलेकर (वय85) व मुलगा तेजस विकास गोलेकर (वय 14) यांना मारहाण करून जखमी केले.
- Maharashtra Women Minister Portfolio : महायुती सरकार मधील महिला मंत्र्यांकडे कोणत्या मंत्रालयाची जबाबदारी ? जाणून घ्या सविस्तर
- Krushi Mantri Maharashtra 2024 : माणिकराव कोकाटे बनले महाराष्ट्राचे नवे कृषिमंत्री !
- Big News : महायुती सरकारकडून प्रशासनात मोठी खांदेपालट, महाराष्ट्रातील २३ बड्या सनदी अधिकार्यांच्या बदल्या !
- Maharashtra Cabinet portfolio Allocation 2024 : पहिल्यांदाच मंत्री झालेल्या नेत्यांना वजनदार खात्यांची लाॅटरी, तर दिग्गज नेत्यांना मोठा झटका
- Maharashtra Cabinet Portfolio : महायुती सरकारच्या मंत्रिमंडळाचे खातेवाटप जाहीर, कोणत्या मंत्र्याकडे कोणते खाते? वाचा संपूर्ण यादी
तसेच लता विकास गोलेकर (वय35) यांच्या अंगावरील सोने चोरट्यांनी दम देऊन चाकूचा धाक दाखवून ओरबाडून चोरून नेले.चोरट्यांनी लता गोलेकर यांच्या अंगावरील 40 हजार रुपये किमतीचे सोन्याचे मनी, मंगळसूत्र व जुने सोने, 26 हजार रुपये किमतीचे सहा ग्रॅम वजनाचे सोन्याचे झुंबर, साखळी व कुडके असा ६६ हजार रुपयांचा ऐवज चोरट्यांनी चोरून नेला.
शनिवारी पहाटे तीनच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी विकास गोलेकर यांच्या राहत्या घराच्या समोरील दरवाजा उघडून त्यांच्या पत्नीच्या अंगावरील सोन्याचे दागिने चाकूचा धाक दाखवून चोरून नेले.
तसेच विकास गोलेकर यांच्या रूमला बाहेरून कडी लावून वडिलांच्या खोलीत जाऊन चोरट्यांनी फिर्यादीच्या वडिलांच्या हातावर मारहाण केली तसेच फिर्यादीच्या मुलाच्या डोक्यात काठी मारली अशी फिर्याद विकास गोलेकर यांनी दाखल केली.
दरम्यान घटनेनंतर विकास गोलेकर यांनी जामखेड पोलिसांशी संपर्क केला. पोलिसांनी घटनेचे गांभीर्य ओळखून तातडीने घटनास्थळी धाव घेतली. यावेळी पोलिसांनी घटनास्थळी डॉग स्कॉड पाचारण केले. चोरट्यांनी घरातून नेलेली पेटी कैलास गोलेकर यांच्या शेतात टाकली होती.डॉग स्कॉडने पेटी पर्यंत मागोवा काढला परंतु पुढे कुठलाही सुगावा लागला नाही.
दरम्यान पहाटे घडलेल्या घटनेमुळे खर्डा परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. या घटनेत सहभागी चोरांच्या मुसक्या आवळण्यासाठी गुन्हा शोध पथकाने वेगाने तपास हाती घेतला आहे.
पुढील तपास पोलीस निरीक्षक संभाजीराव गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरीक्षक सुनील बडे हे करत आहे.