जामखेड टाइम्स वृत्तसेवा । जामखेड तालुक्यातील खर्डा परिसरातून एक खळबळजनक बातमी समोर आली आहे. खर्डा पोलिस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या एका गावातून बारावीत शिक्षण घेत असलेल्या मुलीचे अपहरण झाल्याची घटना उघडकीस आली आहे. या घटनेमुळे खर्डा परिसर हादरून गेला आहे, याप्रकरणी एका संशयिताविरोधात खर्डा पोलिस स्टेशनला अपहरणाचा गुन्हा दाखल आला आहे.
पोलिस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, जामखेड तालुक्यातील गवळवाडी येथील गणेश पांडुरंग काळे या तरूणाने दि 9 सप्टेंबर 2022 रोजी मध्यरात्रीच्या साडेबारा ते एकच्या सुमारास गावातील एका बारावीत शिक्षण घेत असलेल्या मुलीला कश्याचे तरी आमिष दाखवत फुस लावून पळवून नेल्याची घटना घडली आहे. याबाबत मुलीच्या वडीलांनी खर्डा पोलीस स्टेशनला अपहरणाची फिर्याद दाखल केली आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रकाश पाटील हे करत आहे.
दरम्यान जामखेड तालुक्यात गेल्या काही वर्षांपासून अल्पवयीन मुलींना प्रेमाच्या जाळ्यात अडकवून फुस लावत पळवून नेण्याच्या घटना वाढल्या आहेत. अश्या घटनांना पायबंद घालण्यासाठी शाळा, विद्यालय स्तरावर व्यापक मोहिम राबवण्याची आवश्यकता आहे. मुलींना निर्भय वातावरणात चांगले शिक्षण मिळावे अशी पालकांची इच्छा आहे. तालुक्यातील मोठ्या शाळांच्या आवारात रोड रोमियोंनी मांडलेल्या उच्छादाचा बिमोड करण्यासाठी जामखेड आणि खर्डा पोलिसांकडूून कारवाईचा दंडूका सतत उगारला जाणे आवश्यक आहे अशी मागणी पालकांकडून होत आहे.