जामखेड टाईम्स वृत्तसेवा : जामखेड शहरातील ओम ड्रायव्हींग स्कूलच्या संचालकाला एका नाजुक प्रकरणात जामखेड पोलिसांनी बेड्या ठोकण्याची धडक कारवाई केली.नाजुक प्रकरणामुळे शहरात मोठी खळबळ उडाली आहे.
याबाबत सविस्तर असे की, जामखेड शहरात ओम मोटार ड्रायव्हींग स्कूल आहे. या स्कूलमध्ये वाहन चालवण्याचे प्रशिक्षण दिले जाते. यासाठी महिला तरूणी ड्रायव्हींग शिकण्यासाठी मोठ्या प्रमाणात प्रवेश घेत असतात. सदर ओम मोटार ड्रायव्हींग स्कूलमध्ये एका तरुणीने प्रवेश घेतला होता.
सदर तरूणी ड्रायव्हींग शिकण्यासाठी दि 23 रोजी ड्रायव्हींग स्कूलमध्ये नेहमीप्रमाणे गेली होती. यावेळी ड्रायव्हींग स्कूलचा संचालक संदिप झुंबर गर्जे याने सदर तरूणीला ड्रायव्हींग शिकवण्यासाठी स्काँर्पीओ गाडी नंबर MH-16-BY-5439 या गाडीतून जामखेड पंचायत समिती ते गौरी हाँटेल जवळील पटांगण परिसरात गाडी शिकवत असताना स्टेअरिंग पकडण्याच्या बहाण्याने तरूणीला लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन केले. संचालकांच्या कृत्याने घाबरलेल्या तरुणीने थेट पोलिस स्टेशन गाठत त्याच्या विरोधात फिर्याद दाखल केली.
पिडीत तरुणीच्या फिर्यादीवरून ओम ड्रायव्हींग स्कूलचा संचालक यांच्याविरोधात गुरनं व कलम 468/2021 भा.द.वि. कलम 354 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला. जामखेड पोलिसांनी तातडीने या गंभीर प्रकाराची दखल घेत आरोपीला बेड्या ठोकल्या. पोलिसांनी स्काँर्पीओ गाडी जप्त केली आहे. सदर आरोपीला जामखेड न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याला जामीन मंजूर केला.
ओम ड्रायव्हींग स्कूलच्या संचालकानेच नाजूक प्रकरण केल्याने शहरात मोठी खळबळ उडाली आहे. शहरातील महिला व तरूणी या ड्रायव्हींग स्कूलमध्ये मोटार ड्रायव्हींगचे प्रशिक्षण घेण्यासाठी मोठ्या प्रमाणात प्रवेश घेतात. आता त्या सर्वांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
सदर प्रकरणाचा पुढील तपास पोलिस निरीक्षक संभाजीराव गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक राजु थोरात हे करत आहेत.