Burglary Incident | भरदिवसा झालेल्या घरफोडीच्या घटनेने पिंपरखेड हादरले :चोरट्यांनी मारला दीड लाखांच्या ऐवजावर डल्ला !

जामखेड टाईम्स वृत्तसेवा : Burglary Incident | जामखेड तालुक्यात गेल्या काही दिवसांपासून भरदिवसा घरफोडीच्या घटना सातत्याने अधुन मधून घडताना दिसत आहेत. पिंपरखेड परिसरात या घटनांमध्ये वाढ झाली आहे. गुरुवारी  पुन्हा चोरट्यांनी पिंपरखेडमध्ये भरदिवसा घरफोडी करत दीड लाखांचा ऐवज घेऊन पोबारा केला आहे.घरफोडीच्या घटनेमुळे पिंपरखेडमध्ये मोठी खळबळ उडाली आहे. (The burglary incident shook Pimparkhed,Thieves stole Rs 1.5 lakh)

गेल्या काही दिवसांपासून पिंपरखेड सह आदी भागात चोरीच्या घटना वाढल्या आहेत. चोरट्यांच्या दहशतीमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. चोरट्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी जनतेतून जोर धरू लागली आहे.

दरम्यान गुरुवारी, 30 रोजी  पिंपरखेड गाव घरफोडीच्या घटनेने पुन्हा हादरले. शुक्रवारी पिंपरखेड येथील दादा बळीराम ढवळे हे आपल्या पत्नीसह सकाळी अकराच्या सुमारास घराला कुलूप लावून घरापासून जवळच असलेल्या शेतात लिंबू काढणीस गेले होते. लिंबू काढून झाल्यानंतर लिंबाची गोणी घरी ठेवण्यासाठी दुपारी एक वाजेच्या सुमारास ढवळे हे घरी आले असता त्यांना घराचे कुलूप तोडलेले व  घराचा दरवाजा उघडा दिसला. तेव्हा त्यांनी पत्नीला शेतातून बोलावून आणले व घरात जाऊन पाहिले असता घरामधील सर्व सामानाची उचकापाचक झालेली दिसली.

Burglary Incident | The burglary incident shook Pimparkhed Thieves stole Rs 1.5 lakh
घटनास्थळाची पाहणी करताना सहाय्यक पोलीस निरीक्षक महेश जानकर सह आदी

घरामधील लाकडी कपाटाचे लॉक तुटलेले होते. कपाटामध्ये ठेवलेले साड्या व कपड्यांची उचकापाचक केलेली होती.कपाटात ठेवलेले सोन्याचे दागिने व रोख 30 हजार रूपये मिळून आले नाही.घराच्या आसपास पाहिले पण मुद्देमाल मिळून आला नाही.अज्ञात चोरट्यांनी सुमारे दीड लाख रूपयांचा मुद्देमाल चोरून नेल्याची फिर्याद ढवळे यांनी दिली आहे.

दरम्यान घटनेची माहिती समजताच पोलिस निरीक्षक संभाजीराव गायकवाड, सहायक पोलीस निरीक्षक महेश जानकर, हेड कॉन्स्टेबल संजय लोखंडे, पोलिस कॉंस्टेबल विष्णू चव्हाण यांच्या पथकाने तातडीने घटनास्थळी दाखल होत पाहणी केली. दरम्यान चोरांचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी श्वानपथकाला पाचारण केले होते. परंतु चोरट्यांचा सुगावा लागला नाही.

Burglary Incident | The burglary incident shook Pimparkhed Thieves stole Rs 1.5 lakh
घटनास्थळाची पाहणी करताना सहाय्यक पोलीस निरीक्षक महेश जानकर सह आदी

दरम्यान गुरुवारी,30 रोजी सायंकाळी दादा बळीराम ढवळे (वय 50) यांनी अज्ञात चोरट्याविरोधात घरफोडीचा गुन्हा दाखल केला आहे. या फिर्यादीनुसार दादा ढवळे यांच्या घरातून 01 लाख 25 हजार रूपयांचे सोन्याचे दागिने तर रोख 30 हजार असा एकुण 01 लाख 55 हजाराचा मुद्देमाल चोरीस गेला आहे असे म्हटले आहे. दाखल अंमलदार म्हणून पोलिस नाईक अजय साठे यांनी काम पाहिले. पुढील तपास जामखेड पोलिस करत आहेत.

 

web titel : Burglary Incident | The burglary incident shook Pimparkhed Thieves stole Rs 1.5 lakh