Thieves continue to thrive in Jamkhed taluka | जामखेड तालुक्यात चोरट्यांचा धुडगूस सुरूच

Thieves continue to thrive in Jamkhed taluka | जामखेड टाईम्स वृत्तसेवा : जामखेड तालुक्यात गेल्या काही दिवसांपासून चोरट्यांचा सुळसुळाट वाढला आहे. भरदिवसा जबरी चोरी, घरफोडीच्या घटना होत आहेत.जामखेड तालुक्यात चोरट्यांचा सुरू असलेला धुडगूस कधी थांबणार ? असा सवाल आता जनतेतून विचारला जात. चोरट्यांच्या सुळसुळाटामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.

ऐन बैल पोळा सणाच्या पार्श्वभूमीवर जामखेड तालुक्यात चोरट्यांनी पुन्हा डोके वर काढले आहे. जामखेड तालुक्यातील पिंपरखेड येथे भरदिवसा जबरी चोरीची घटना घडली आहे. या घटनेत चोरट्यांनी तब्बल 2 लाख रूपयांच्या ऐवजावर डल्ला मारला आहे. ही घटना पिंपरखेडच्या शिंदेवस्तीवर घडली आहे. (Thieves continue to thrive in Jamkhed taluka)

दि 04 सप्टेंबर रोजी शिंदेवस्ती येथील विठ्ठल शिंदे हे आपल्या मुलासह जामखेडला दवाखान्यात उपचार घेत असलेल्या मुलीला भेटण्यासाठी गेले होते.फिर्यादी विठ्ठल शिंदे यांच्या घरी कुणी नसल्याचा फायदा उचलत अज्ञात चोरट्यांनी शिंदे यांच्या  घराचे कुलूप तोडून घरातील कपाटात ठेवलेले सोन्याचे गंठण, मिनी गंठण, कानातील फुले व आंगठी असा १ लाख ७० रुपये किमतीचा सोन्याचा ऐवज चोरटय़ाने चोरून नेला. हे सर्व दागिणे प्रसूतीसाठी माहेरी आलेल्या शिंदे यांच्या मुलीचे होते.

याबाबत पिंपरखेड येथील विठ्ठल ज्ञानदेव शिंदे यांनी जामखेड पोलिस स्टेशनला अज्ञात चोरट्यांविरोधात फिर्याद दिली आहे. पोलिस निरीक्षक संभाजीराव गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरीक्षक महेश जानकर हे पुढील तपास करत आहेत.

 

web title: Thieves continue to thrive in Jamkhed taluka