Big Breaking | जामखेड तालुक्यात सावकारकीचा तिसरा गुन्हा दाखल:अवैध सावकारांचे धाबे दणाणले

जामखेड टाईम्स वृत्तसेवा : Big Breaking | जामखेड तालुक्यात अवैध सावकारकीचा बिमोड करण्यासाठी सरसावलेल्या जामखेड पोलिसांना आता मोठे यश येताना दिसत आहे. बुधवारी जामखेड तालुक्यात सावकारकीचा तिसरा गुन्हा दाखल झाला आहे. या कारवाईमुळे तालुक्यातील सावकारांचे धाबे दणाणले आहेत.

जामखेड तालुक्यातील बांधखडक येथील दोघा जणांविरोधात सावकारकीचा गुन्हा दाखल झाला आहे. जामखेड पोलिस स्टेशनला सुनिल लक्ष्मण अडागळे या झाडू विक्रेत्याने  फिर्याद दाखल केली आहे.

याबाबत जामखेड पोलिस स्टेशनला दाखल करण्यात आलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, बांधखडक येथील सोपान बाजीराव वनवे याने फिर्यादी सुनिल लक्ष्मण अडागळे यांनी 5% दराने 20 हजार रूपये दिले होते. त्या व्याजापोटी 50, हजार रूपये फिर्यादीने सावकाराला दिले होते. परंतु 15 हजार रूपये राहिले आहेत. असे म्हणून सावकाराने फिर्यादीकडे पैश्यांचा तगादा लावला होता. पैश्याची मागणी करत सोमीनाथ बाजीराव वनवे याने 27 रोजी सकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास फिर्यादीच्या घरासमोर बांधलेल्या दोन शेळ्या बळजबरीने घेऊन गेला होता.

सदरच्या शेळ्या आणण्यासाठी फिर्यादीची पत्नी ही सोपान बाजीराव वनवे याच्याकडे गेली असता आरोपी वनवे म्हणाला की, माझे पैसे अत्ताच्या अत्ता दे व तुझ्या शेळ्या घेऊन जा असे म्हणत फिर्यादीच्या पत्नीस शिवीगाळ व दमदाटी करण्याबरोबर मारहाण केली होती.

त्यानंतर सोपान बाजीराव वनवे हा फिर्यादीच्या घरासमोर गेला म्हणाला की, मी गावात लोकांना साखर वाटली आहे. माझे कोणी काही वाकडे करू शकत नाही असे म्हणून फिर्यादी व त्यांचे कुटुंबियांना शिवीगाळ केली असे फिर्यादीत म्हटले आहे.

दरम्यान जामखेड पोलिस स्टेशनला जामखेड तालुक्यातील बांधखडक येथील सुनिल लक्ष्मण अडागले (धंदा झाडू बनवणे) यांनी फिर्याद दाखल केली आहे. त्यानुसार बांधखडक येथील सोमीनाथ बाजीराव वनवे व सोपान बाजीराव वनवे या दोघा सावकारांविरोधात गु.र.नं. व कलम 435/2021 भा.द.वि. कलम 327, 323, 504, 506, 34 महाराष्ट्र सावकारी अधिनियम कायदा कलम 39 प्रमाणे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.  या प्रकरणाचा पुढील तपास पोलिस निरिक्षक संभाजीराव गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस नाईक संभाजी शेंडे हे करत आहेत.

 

web titel : Big Breaking | Third case of lending filed in Jamkhed taluka