जामखेडमध्ये गावठी बंदूक विक्रीस आलेल्या दोघांना जामखेड पोलिसांनी ठोकल्या बेड्या !

जामखेड टाईम्स वृत्तसेवा । जामखेड बसस्थानक परिसरात गावठी बंदूक विक्री करण्यासाठी आलेल्या दोघांना बंदुकीसह ताब्यात घेण्याची धडक कारवाई जामखेड पोलिसांनी पार पाडली. ही धडाकेबाज कारवाई शनिवारी रात्री 8 वाजता करण्यात आली.

20 मार्च रोजी बीड जिल्ह्यातील दोघे जण जामखेड बसस्थानक परिसरात गावठी बंदूक विक्री करण्यासाठी येणार असल्याची गुप्त माहिती पोलिस नाईक अजय साठे यांना मिळाली होती. त्यानुसार साठे यांनी सदर बातमी पोलिस निरीक्षक संभाजीराव गायकवाड यांना कळवली. त्यानंतर गायकवाड यांनी एक पथक तयार करून तातडीने कारवाई करण्यासाठी रवाना केले.

जामखेड पोलिसांनी मिळालेल्या बातमीची खातरजमा करण्यासाठी बसस्थानक परिसरात सापळा लावला. यावेळी मिळालेल्या माहितीच्या वर्णनाचे दोघे इसम  अमोल जायभाय यांच्या चहाच्या टपरीवर चहा पित असल्याचे आढळून आले.

त्या दोघांना पोलिसांनी शिताफीने ताब्यात घेतले. पंचासमक्ष त्यांची अंगझडती घेतली असता त्यांच्याकडे 25 हजार रूपये किमतीची देशी बनावटीची बंदूक हस्तगत करण्यात आली. दोघे इसम बंदूक विक्री करण्यासाठी जामखेडमध्ये आल्याचे पोलिस चौकशीत निष्पन्न झाले.

दरम्यान जामखेड पोलिस स्टेशनचे पोलिस काँस्टेबल शाम गुंजाळ यांच्या फिर्यादीवरून आण्णा अहिलाजी शिंदे व विकास बळीराम नवगिरे ( दोघे राहणार हरकीलिंबगाव ता माजलगाव जि बीड) या दोघांविरुद्ध आर्म अॅक्ट सह विविध कलमान्वये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. पुढील तपास हेड कॉन्स्टेबल संजय लाटे व पोलिस नाईक अजय साठे हे करत आहेत.

पोलिस निरीक्षक संभाजीराव गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आलेल्या कारवाईच्या पथकात हेड कॉन्स्टेबल संजय लाटे, पोलिस नाईक अजय साठे, पोलिस काँस्टेबल शाम गुंजाळ, बाळू खाडे, सचिन सगर, नवनाथ शेकडे, विष्णू चव्हाण, सह आदींचा समावेश