A Gujarne Wali Hawa Bata Mera itna Kaam Karegi Kya | एका गाण्याने तो झाला व्हायरल आणि समोर आली सुरक्षा रक्षक गायकाच्या संघर्षमय प्रवासाची कहाणी !

mumbai Security guard's video goes viral on social media

 मुंबई : A Gujarne Wali Hawa Bata Mera itna Kaam Karegi Kya | ” ऐ गुजरने वाली हवा बता .. मेरा इतना काम करेगी क्या.. मेरे गाँव जा, मेरे दोस्तों को सलाम दे.. मेरे गाँव में है जो वो गली..जहाँ रहती है मेरी दिलरुबा…उसे मेरे प्यार का जाम दे” या  गाण्यामुळे एका सुरक्षा रक्षकाचा व्हिडीओ गेल्या तीन दिवसांपासून सोशल मिडीयावर प्रचंड वायरल झाला आहे. (mumbai Security guard’s video goes viral on social media)

इतक्या सुंदर आवाजात गाणारा हा सुरक्षा रक्षक नेमका आहे तरी कोण ? त्याच्या आयुष्यात गायनाचे नेमके काय स्थान आहे? तो इतका सुंदर गातो कसा ? त्याचा नेमका प्रवास काय ? हे जाणून घेण्यासाठी जामखेड टाईम्सच्या टीमने शोध घेण्याचा प्रयत्न केला असता एक थरारक संघर्षमय प्रवास समोर आला आहे. मानवी आयुष्याचा संघर्ष किती टोकाचा असु शकतो ? (How extreme can the struggle of human life be? This is the story)

याचीच ही कहाणी आम्ही तुमच्यापर्यंत घेऊन आलो आहोत.

त्याचे शिक्षण अवघे इयत्ता सातवीपर्यंत… आई-वडिलांच्या निधनानंतर खऱ्या अर्थाने जगायला आणि जबाबदारी पेलायला शिकला. लहानपणापासून  रेडिओ आणि टीव्हीवर गाणे ऐकुन तो गाणे गायला शिकला, त्याची हिच य आवड त्याचा रोजगार बनली. गेली दहा वर्षे मुंबईतील मोठ-मोठ्या हॉटेल्समध्ये गाणे गाऊन संसाराचा गाडा हाकत होता. (A Gujarne Wali Hawa Bata Mera itna Kaam Karegi Kya)

पण दुर्दैवाने 2020 च्या कोरोना महामारीने अनेकांचा जसा हक्काचा रोजगार हिरावला तसाच त्याचाही.. पण लहानपणापासून जगण्याच्या संघर्षाशी दोन हात करणारा तो हार मानेल तो कसला? रोजीरोटीसाठी त्याने मिळेल ते काम हाती घेतले पण आता तो  सुरक्षा रक्षक म्हणून काम करून जगतोय… ही कहाणी आहे मुंबईतील वसीम सय्यद या कलाकाराची ! (This is the story of Wasim sayyed from vasai virar Mumbai)

वसीम सय्यदचे कुटुंब तसे मुळचे उत्तरप्रदेशातील पण वसीम जन्माने मुंबईकर आहे. त्याची जन्मभूमी व कर्मभूमी आता मुंबईच आहे. सध्या तो मुंबईतील विरार परिसरातील एका सोसायटीत सुरक्षा रक्षक म्हणून कामास आहे.(mumbai Security guard’s video goes viral on social media)

सुरक्षा रक्षक वसीम सय्यद अचानक सोशल मिडीयावर प्रकाशझोतात का आला ?

तर झाले असे की विरारच्या ज्या सोसायटीत वसीम हा सुरक्षा रक्षक म्हणून कामास आहे. त्या सोसायटीत १५ ऑगस्ट रोजी पार पडलेल्या स्वातंत्र्यदिनाच्या कार्यक्रमात त्याने (ऐ गुजरने वाली हवा बता) हे देशभक्तीपर गीत गायले. सोसायटीतील सदस्यांना त्याचे हे गाणे प्रचंड भावले. ज्यांनी ज्यांनी हे गीत फोनवर रेकॉर्ड केले होते त्यांनी तो व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट केला. अन त्याचे हेच गाणे गेल्या तीन चार दिवसांपासून सोशल मिडीयावर जोरदार वायरल झाले आहे. (A Gujarne Wali Hawa Bata Mera itna Kaam Karegi Kya)

म्हणून उलगडला वसीमच्या जगण्याच्या संघर्षाचा जीवनपट

वसीमचे गाणे सोशल मिडीयावर वायरल झाल्यानंतर वसीमची माहिती काढत जामखेड टाईम्सने त्याचा नंबर मिळवला. त्याच्या संवाद साधत त्याचा गायक होण्याचा प्रवास जाणून घेतला असता. यावेळी बोलताना वसीम म्हणाला, मुंबईतील नालासोपारा येथील शाळेत इयत्ता सातवी पर्यंत शिक्षण झालं.आई-वडिल असेपर्यंत कुटुंबाची जबाबदारी नव्हती. आई-वडिलांच्या निधनानंतर आयुष्य पार बदलून गेलं.(A Gujarne Wali Hawa Bata Mera itna Kaam Karegi Kya)

लढत लढत जगायला शिकलो. लहानपणापासून टिव्ही रेडिओवर गाणे ऐकण्याची आवड निर्माण झाली होती. हेच गाणे माझ्या आयुष्यात रोजीरोटी निर्माण करणारं ठरलं. कोरोना येण्यापूर्वी मुंबईतील हॉटेल्समध्ये भजन, नवी व जुनी गाणे गात होतो. विशेषता: स्व. मोहम्मद रफी यांची गाणी सर्वाधिक गातो. (vasim sings most songs of the mohammed rafi) मला दररोज हजार ते बाराशे रुपये मिळायचे,  त्यातूनच घर चालत असे. घरी बायको एकटीच आहे. आम्हा दोघांचा संसार सुरळीत सुरू होता.(A Gujarne Wali Hawa Bata Mera itna Kaam Karegi Kya)

कोरोना आला अन आयुष्यात मोठा उलटफेर झाला

परंतु कोरोना आला अन आयुष्यात मोठा उलटफेर झाला. लाॅकडाऊनमुळे सर्व हॉटेल्स बंद झाली. जगायला रोज मिळणारे पैसेही येणे बंद झाले. लाॅकडाऊनमध्ये शिलकीतले पैसे खर्च झाले. मग मिळेल ते काम मिळवण्याची धडपड सुरू झाली. मिळेल ते काम करून घरसंसार चालवत होतो. मग मागच्या दोन तीन महिन्यापूर्वी वसई पूर्व भागातील विना डायनेस्टी या सोसायटीमध्ये सुरक्षारक्षक म्हणून काम मिळाले. (Working as a security guard in Vina Dynasty Society in Vasai East)आता येथे रोज सकाळी आठ ते रात्री आठ वाजेपर्यंत काम करतो, अशी माहिती वसीम याने दिली. (A Gujarne Wali Hawa Bata Mera itna Kaam Karegi Kya)

१५ ऑगस्ट रोजी काय घडलं ?

स्वातंत्र्यदिनानिमित्त (Independence Day 2021)सोसायटीच्या आवारात एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलं होते. त्यासाठी सर्व लोक एकत्र आले होते. देशभक्तीपर गाण्यांची रेलचेल होती. त्याचवेळी वसीमच्या अंगातील कलाकार जागा झाला. त्याने थेट सोसायटीतील सदस्यांना मी एक देशभक्तीपर गाणं गाऊ का ? अशी  विनंती केली.  सर्वांनी लगेच होकार दिला. मग काय वसीमने “ऐ गुजरने वाली हवा बता..मेरा इतना काम करेगी क्या.. मेरे गाँव जा, मेरे दोस्तों को सलाम दे.. मेरे गाँव में है जो वो गली..जहाँ रहती है मेरी दिलरुबा…उसे मेरे प्यार का जाम दे” हे  देशभक्तीपर गाण गायलं. वसीमने मनापासून गायलेलं गाणं सर्वांनाच आवडलं. (A Gujarne Wali Hawa Bata Mera itna Kaam Karegi Kya)

सगळ्यांनी माझं कौतुक केलं. अनेक जण गळ्यातुन गातात तू मात्र मनातून गायलास, अशा शब्दांत सर्वांनी कौतुक केलं आहे. त्यामुळे खूप बरं वाटतं, असे वसीम यावेळी बोलताना म्हणाला.

 

वसीमचा वसीम सय्यद नावाने युटूब चॅनल आहे, त्यावर तीन व्हिडीओ अपलोड केले आहेत.  तीनही व्हिडीओ हे  स्टेज परफॉर्मन्सचे आहेत. एका व्हिडीओमध्ये सूत्रसंचालन करणारा वसीम याची ओळख करून देताना, तो बऱ्याच वर्षांपासून मुंबईत वास्तव्यास आहे, तो, आपल्या समोर गाणं सादर करणार आहे, असे म्हणतो. त्यावेळी वसीम म्हणतो, आप लोक सहरदपर देश और हमारी सुरक्षा करते है, आपकी ही बदौलत हम घर मे सुकून से सोते है, यावरून समोर बसलेले प्रेक्षक हे भारतीय सैनिक असावेत असे दिसते.(A Gujarne Wali Hawa Bata Mera itna Kaam Karegi Kya)

संकटे कितीही आली तरी पराभव मानणार नाही

आयुष्यात खूप काही करायचं आहे,  त्यासाठी जे काही करावं लागेल ते करण्याचा प्रामाणिक प्रयत्न करतो आहे. मी मोहम्मद रफी यांना अधिक ऐकतो आणि गातो. गाणे गाण्यासाठी कुठलेही शिक्षण घेतले नाही किंवा रियाज केला नाही. बॉलिवूड मध्ये गाण्याची संधी शोधतोय, यापूर्वी खूप प्रयत्न केले आहेत. पण यश मिळालं नाही. भविष्यात प्रयत्न सोडणार नाही, विश्वास आहे, एक दिवस संधी मिळेल, असा आशावाद वसीमने यावेळी बोलताना केला आहे.(A Gujarne Wali Hawa Bata Mera itna Kaam Karegi Kya)

सोसायटीतील सदस्यांनी केला व्हिडीओ व्हायरल

आमच्या वीणा डायनेस्टी फेज – १, एव्हशाईन सिटी लास्ट बस स्टॉप, वसई पूर्व,  (Vina Dynasty Society Phase-1, Eveshine City Last Bus Stop Vasai East) सोसायटीतील सदस्य राजेश शिर्के म्हणतात, “सुरक्षा रक्षक वसीम सय्यद याने सुंदर आवाजात गाणं म्हणून सगळ्यांची मन जिंकुन घेतली आहेत.  तुम्हालाही आवडलं असल्यास पुढे शेअर करा असे अवाहन केलं आहे.(A Gujarne Wali Hawa Bata Mera itna Kaam Karegi Kya)

आयुष्य खुप सुंदर आहे पण संघर्षाच्या लढाईत आयुष्याला सुंदर बनवण्यासाठी आपण सदैव तयार असायला हवं हाच संदेश वसीमची कहाणी सर्वांना देऊ पाहत आहे. वसीम काय किंवा वसीम सारखे लाखो माणसे काय सगळ्यांच्या आयुष्यातील प्रत्येक पदर हा मानवी जगण्यातील ऊर्जाकेंद्र आहे. तो आपण टिपायला तर हवाच !(A Gujarne Wali Hawa Bata Mera itna Kaam Karegi Kya)

 

स्टोरी – सत्तार शेख (जामखेड टाईम्स वृत्तसेवा)