bigg boss marathi season 3 |  बिग बाॅस मराठीच्या 15 स्पर्धकांमध्ये अभिनेते, अभिनेत्री, कीर्तनकार, सामाजिक कार्यकर्त्यांचा समावेश !

जामखेड टाईम्स वृत्तसेवा । कलर्स मराठीवरील बहुचर्चित बिग बॉस मराठीच्या सिझन तीनची सुरूवात झाली आहे. या सिजनमध्ये स्पर्धक म्हणून कोण कोण असणार याची सर्वांनाच उत्सुकता लागली होती. त्यासाठी अनेक ठोकताळे बांधले जात होते. मात्र, ही उत्सुकता रविवारी संपली.बिग बाॅस मराठीने सिझन तीनसाठी 15 स्पर्धकांची नावे जाहीर केली आहेत. (bigg boss marathi season 3 all contestants names)

bigg boss marathi season 3

आता मराठी प्रेक्षकांना पुढचे शंभर दिवस बिग बॉस मराठीच्या घरात मनोरंजन, भांडण, ड्रामा अन् बरंच काही पाहायला मिळणार आहे. बिग बॉस मराठीच्या घरात एकूण 15 स्पर्धकांचा अधिकृत प्रवेश झाला आहे.

स्पर्धकांमध्ये अभिनेते, अभिनेत्री, कीर्तनकार, सामाजिक कार्यकर्ते यांचा समावेश आहे. त्यांनी बिग बॉसच्या घरात प्रवेश केला.प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठी ते सज्ज झाले आहेत.बिग बॉसच्या घरात प्रवेश केलेले सर्व स्पर्धक पाहून यावेळी प्रेक्षकांना अनलिमिटेड मनोरंजन मिळेल असेच दिसत आहे. (bigg boss marathi season 3 all contestants names)

बिग बॉसच्या घरात कुणा कुणाचा झाला प्रवेश ?

रविवारी बिग बॉस मराठीच्या सिझन तीनचा प्रिमियर शो पार पडला. यावेळच्या सर्वच स्पर्धकांनी मोठ्या थाटामाटात बिगबॉसच्या घरात प्रवेश केला. यामध्ये बिग बॉसच्या घरात सर्वात आधी प्रेवश करण्याचा मान देवमाणूस या मालिकेच्या माध्यमातून घराघरात पोहोचलेल्या सोनाली पाटीलला मिळाला. त्यानंतर बिग बॉसच्या घरामध्ये अभिनेता विशाल निकम, गायक उत्कर्ष शिंदे, सामाजिक कार्यकर्त्या तृप्ती देसाई, किर्तनकार शिवलीला बाळासाहेब पाटील तसेच इतरांनी प्रवेश केला.(bigg boss marathi season 3 all contestants names)

बिग बॉस मराठीच्या सिझन तीमधील स्पर्धकांची नावे (bigg boss marathi season 3 all contestants names)

1) अभिनेत्री सोनाली पाटील

2) अभिनेता विशाल निकम

3) गायक उत्कर्ष शिंदे

4) अभिनेत्री मीरा जगन्नाथ

5) अभिनेत्री स्नेहा वाघ

6) अभिनेता अविष्कार दारव्हेकर

7) सामाजिक कार्यकर्त्या तृप्ती देसाई

8) सुरेखा कुडची

9) अभिनेत्री ‘गायत्री दातार’

10) किर्तनकार शिवलीला बाळासाहेब पाटील

11) अभिनेता विकास पाटील

12) अभिनेता जय दुधाणे

13) अभिनेत्री मीनल शाह

14) अभिनेता अक्षय वाघमारे

15) संतोष चौधरी

दरम्यान, बिग बॉस मराठीच्या सीझन तीनचे सूत्रसंचालन अभिनेते तसेच दिग्दर्शक महेश मांजरेकर करणार आहेत. यावेळी मांजरेकर यांच्या माध्यमातून बिग बॉस स्पर्धकांना कोणते टास्क देणार ? मागच्या सीझनप्रमाणेच यावेळीसुद्धा तसाच ड्रामा पाहायला मिळणार का ? याची उत्सुकता प्रेक्षकांना लागली आहे. (bigg boss marathi season 3 all contestants names)