Environmental traveler | ध्येयवेडी ! आठ महिने, २३ जिल्हे अन् १० हजार किलोमीटरचा थरारक प्रवास !

विदर्भकन्या ठरतेय महाराष्ट्राचे आकर्षण

जामखेड टाईम्स वृत्तसेवा (सत्तार शेख) :- कुठलीही मदत न घेता स्वता:च्या हिमतीवर ति निघालीय महाराष्ट्राच्या दौर्‍यावर.. बघता बघता आठ महिने सरली, तिने २३ जिल्हे पालथे घालत १० हजार किलोमीटरचा थक्क करणारा प्रवास पुर्ण केला तोही चक्क सायकलवरून.अजुनही तिचा हा प्रवास सुरू आहे. ही कहाणी आहे २१ वर्षीय ध्येयवेड्या धाडसी तरुणीची. ती सायकलवरून का प्रवास करतेय ? चला तर मग जाणून घेऊयात. (Environmental traveler Pranali chikate cycle journey)

सर्वाधिक शेतकरी आत्महत्यांचा जिल्हा म्हणून विदर्भातील यवतमाळची (Yavatmal) देशात ओळख आहे. याच जिल्ह्यात वणी हा तालुका आहे. या तालुक्यातील पुनवट हे एक छोटेसे खेडेगाव आहे. याच खेड्यात लहानाची मोठी झालेली प्रणाली विठ्ठल चिकटे (Pranali vitthal chikate Yavatmal) ही २१ वर्षीय तरूणी समाजासाठी काहीतरी केले पाहिजे यासाठी ती सातत्याने नाविन्याच्या शोधात असायची.(Environmental traveler Pranali chikate cycle journey)

Environmental traveler Pranali chikate cycle journey
Environmental traveler Pranali chikate cycle journey

पुणे येथील यशदा संस्थेकडून चालवल्या जाणाऱ्या एका प्रशिक्षणासाठी ती मागील वर्षी पुण्यात दाखल झाली होती. यशदामध्ये जलसाक्षरता विभागांतर्गत जलदूत म्हणून तीने प्रशिक्षण घेतले. या प्रशिक्षणानंतर पर्यावरण संवर्धन,जलसाक्षरता, महिला सशक्तीकरण या विषयावर राज्यभर जनजागृती करण्याचा विचार तिच्या मनात आला. नुसता विचार करुन ती थांबली नाही तर प्रणालीने आठ महिन्यापूर्वी तिच्या पुनवट गावातून सायकलवरुन प्रवासाला सुरुवात केली. सामान्य शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या प्रणालीचा हा ध्येयवेडा प्रवास कोणत्याही शासकीय अथवा खासगी संस्थेमार्फत नसून तो वैयक्तिकरित्या सुरु आहे. या उपक्रमासाठी तिने कोणाचीही मदत घेतली नसून तो स्व जबाबदारीवर तिचा सायकल प्रवास सुरु केला आहे.(Environmental traveler Pranali chikate cycle journey)

विदर्भातील यवतमाळ जिल्ह्यातील एका छोट्याशा खेड्यातून कोणत्याही सोयी सुविधा नसताना, केवळ एक सायकल हातात घेऊन पर्यावरण संवर्धनाचा विचार घेऊन मुक्त भटकंती करणाऱ्या प्रणाली चे करावे तेव्हढे कौतुक कमीच आहे.गेल्या आठ महिन्यांत प्रणालीने ऊन वारा पाऊस याची तमा न बाळगता राज्यातील २३ जिल्ह्यातून १० हजार किलोमीटरचा प्रवास पुर्ण केला आहे.या प्रवासात वाटेत लागणाऱ्या स्थानिक लोकसंस्कृतीचा, पर्यावरणाचा अभ्यास करत प्रणालीचा प्रवास सुरू आहे. प्रणालीचे चोखळलेली प्रबोधनाची ही वाट नक्कीच प्रेरणादायी आहे.(Environmental traveler Pranali chikate cycle journey)

Environmental traveler Pranali chikate cycle journey
Environmental traveler Pranali chikate cycle journey

सभोवताली, दिवसेंदिवस बदलती भोगवादी जीवनशैली, वाढते मानसिक प्रदूषण त्यातून निर्माण होणारे वातावरणीय प्रदूषण, तापमानवाढ, वातावरणबदल, ऋतुचक्रबदल या बदलाच्या परिणामातुन निर्माण होणाऱ्या आरोग्याच्या आणि शेतीच्या समस्या लक्षात घेतल्या पाहिजेत.सध्या सायकलने प्रवास करत आदिवासी, ग्रामीण, शहरी भागात जाणे, स्थानिक संस्था, शाळा आणि सरकारी यंत्रणेतील अधिकारी व तळाळात काम करणारी व्यक्ती यांना भेटी देणे व जनजागृती उद्देश ठेवून माहिती पोहचविणे, शक्य तितकं लोकांशी समस्याबाबत चर्चा करणे, संवाद साधत त्या- त्या भागातील परिस्थिती समजून घेणे, पर्यावरणाबाबत मानसिकतेचा अभ्यास करत लोकल परिस्थिती समजून घेणे हेही उद्देश आहेत.(Environmental traveler Pranali chikate cycle journey)

Environmental traveler प्रणाली म्हणते …  

हा प्रवास आपला महाराष्ट्र जवळून अनुभवण्याचा, जगण्याचा, स्वतः चे अस्तित्व शोधण्याचा प्रवास आहे. मी सर्वसाधारण शेतकरी कुटुंबातील असुन, प्रवास हा माझा व्यक्तिगत आहे कुठल्याही शासकीय किंवा संस्थेमार्फत निघाली नसून, सोबत, कोणाचीही प्रवासाला स्पॉन्सरशिप नाही. माझा प्रवास स्वजबाबदारीचा असून लोकांकडे खाणे, राहणे असते. सोबत आर्थिक सहकार्य सुद्धा लोकच करतात, प्रवासात लोकांचा प्रतिसाद चांगला मिळतोय. अशा कोविडच्या काळातसुद्धा सहकार्य मिळत आहे. सोबत पर्यावरण हा विषय सर्वांच्या जाणिवेचा असल्याने प्रत्येक टप्प्यावर पोलीस वर्ग सुद्धा सहकार्य करीत आहे. त्यामुळे प्रवास सुरक्षितरीत्या सुरू आहे. माझ्यामुळे कोविडचे संक्रमण होऊ नये याची दक्षता घेऊनच माझा प्रवास सुरू आहे, असे प्रणालीने सांगितले. (Environmental traveler Pranali chikate cycle journey)

अजित पवारांच्या कौतुकाने विदर्भकन्या भारावली !

Environmental traveler Pranali chikate cycle journey
Environmental traveler Pranali chikate cycle journey

पर्यावरण संवर्धन, जलसाक्षरता, महिला सशक्तीकरणा विषयीच्या जनजागृतीसह राज्यातील स्थानिक पर्यावरणाचा अभ्यास करण्यासाठी गेल्या आठ महिन्यापासून सायकलवरुन घराबाहेर पडलेल्या यवतमाळ जिल्ह्यातल्या प्रणाली चिकटे या विदर्भकन्येच्या सायकलचे चाक काही क्षणासाठी बारामतीत विसावले होते. पर्यावरण संवर्धनाचा संदेश देण्यासाठी गेल्या आठ महिन्यापासून २३ जिल्ह्यातून दहा हजार किलोमीटरचा सायकलवरुन प्रवास करणाऱ्या या ध्येयवेड्या जलदूत विदर्भकन्येच्या उपक्रमाची सविस्तर माहिती जाणून घेत, उपमुख्यमंत्री अजित पवार (Deputy Chief Minister Ajit Pawar) यांनी तिच्या पाठीवर कौतुकाची थाप टाकली.(Environmental traveler Pranali chikate cycle journey)

महत्वाचं : तुम्हाला ही बातमी आवडली असेल तर तुमच्या मित्र मंडळीपर्यंत WhatsApp किंवा Facebook च्या माध्यमातून नक्की शेअर करा. आपल्या परिसरातील ब्रेकिंग बातम्यांसाठी Jamkhed Times – जामखेड टाईम्सला YouTube, Facebook, twitter व Dailyhunt वर  न विसरता ‘फॉलो’ (Follow) व सबस्क्राईब (subscribe) करा यातुन आमच्या टिमला ऊर्जा मिळते.